औरंगाबाद : 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.
पहिल्या दिवशी जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतल्या. जेपी नाड्या यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकायच्या हे ठरवले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबाद लोकसभेला भेट दिली. युतीचे सूत्रसंचालन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करणार आहेत. युती 45 लोकसभा आणि 200 विधानसभेच्या जागा जिंकेल.
डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे. भाजप-शिवसेना समन्वयाने आम्ही जिंकू. भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक ताकद देऊ, असे बावनकुळे म्हणाले.
भाजप अध्यक्षांसमोर फक्त पंकजा मुंडेंचं 30 सेकंदांचं भाषण, राजकीय चर्चेला उधाण
युतीमधील समन्वयाने कोणती जागा लढवायची याचा निर्णय होईल. लोकसभेच्या 45 जागा जिंकणार असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये जेपी नड्डा यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या, असा व्हिडिओ शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. अंबादास दानवे यांच्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या, असा व्हिडिओ ट्वीट केला. अंबादास दानवे यांच्या या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘खुर्च्या रिकाम्या नव्हत्या. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही महिला गेल्या.
4 वाजेपासून लोक आले होते. पूर्ण मैदान भरलेले होते. 4 ची वेळ होती, पण 8.30 वाजल्याने उशीर झाला. अंबादास दानवेंना माहिती नाही. या युतीचा खासदार दोन लाख मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल,’ असेही बावनकुळे म्हणाले.
‘विरोधकांचं काम टीका करण्याचेच आहे. अंबादास दानवे यांची किंमत किती व काय? तुम्ही दोन हजार लोक जमवू शकत नाही,’ असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दानवेंना लगावला.
याशिवाय जेपी नड्डा यांनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब देवरस यांचा उल्लेख केला, यावरून अंबादास दानवे यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाही, अशी टीका केली.
त्यावरही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. नड्डांनी दोघांचा उल्लेख केला, बाळासाहेब देवरस आणि बाळासाहेब ठाकरे, तीनदा नाव घेतलेले आहे, दोन्ही विषय वेगळे आहेत, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.
हे देखील वाचा
- Crime News : जावयाचा सासूवर जडला जीव, सासऱ्याला दारू पाजली अन् रातोरात सासू-जावाई झाले पसार
- BCCI ने वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडूंची केली निवड, हर्षा भोगले यांनी संभावित खेळाडूंची यादी केली जाहीर
- Crime News : मी माझ्या आईचा गळा दाबला, प्रियकराने वार केला : 17 वर्षीय आरोपी मुलीचा जबाब