Crime News : जावयाचा सासूवर जडला जीव, सासऱ्याला दारू पाजली अन् रातोरात सासू-जावाई झाले पसार

54
Crime News

Crime News : राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सासू आणि जावयाची विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. 40 वर्षीय सासूचा तिच्या 27 वर्षांच्या जावयावर जीव जडला आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे इतके प्रेमात पडले की एके दिवशी जावयाने सासऱ्याला भरपूर दारू प्यायला लावली, सासरा बेशुद्ध होताच आणि सासूसोबत पळून गेला.

सासर्‍याचे नशा उतरल्यावर जेव्हा डोळे उघडले आणि जे दिसले ते पाहून ते पुन्हा बेशुद्ध झाला आहे. आता सर्व काही कहाणी स्पष्ट झाल्यावर सासऱ्याने पोलिसात धाव घेतली आहे.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. त्याला नाती आणि समाज यांचे काही देणेघेणे रहात नाही. अनादरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सियाकारा गावात असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

सासूचे जावयावर इतके प्रेम आहे की तिने पतीला आणि जावयाने पत्नीला सोडून घरातून रविवारी पळ काढला आहे. जावई नारायण जोगी याच्याविरुद्ध सासऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्यांची मुलगी किसना हिचा विवाह नारायण जोगी यांच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी आणि जावई घरी यायचे. 31 डिसेंबरला जावई आला. यावेळी त्यांनी सासरे रमेश यांच्यासोबत दारू पार्टी केली.

रमेशला भरपूर दारू पाजली, त्यामुळे सासरे रमेश हे दारूच्या नशेत होता. पहाटे 4 वाजता डोळे उघडले तेव्हा पत्नी व जावई घरी नव्हते. दोघेही बेपत्ता होते, त्यामुळे शोध घेतला असता पत्नी आणि जावई एकमेकांसोबत पळून गेल्याचे जेव्हा समजले तेव्हा या धक्क्यामुळे पुन्हा बेशुद्ध झाला.

मुलगी सासरच्या घरी होती. सकाळी जेव्हा त्याने तिला फोन केला तेव्हा तिला सर्व घटना त्याच्या लक्षात आली. या घटनेचा सासरच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे.

सासऱ्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. चौघेही विवाहित आहेत. जावयालाही तीन मुले आहेत. सासू सोबत घर सोडून पळून जाताना त्याने आपल्या एका मुलीलाही सोबत नेले आहे. आता पोलीस प्रियकर सून आणि सासूचा शोध घेत आहेत.