अंधेरी : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
याच कारणास्तव त्यांनी महिनाभरापूर्वी महापालिकेच्या नोकरीचाही राजीनामा दिला आहे. तरीही मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.
त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवस शिल्लक असल्याने पालिकेत शिवसेना ठाकरे गटात धावपळ सुरू झाली आहे.
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावाचे पोस्टर जाहीर; एकनाथ शिंदे यांचे लक्षवेधी ट्विट
ऋतुजा लटके या महापालिका जिल्हा उपायुक्त कार्यालयात कार्यरत असून, हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अखत्यारीत येत असल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी माजी मंत्री अनिल परब यांनी सोमवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची भेट घेतल्याचेही सांगण्यात आले.
एक महिन्यापूर्वी अर्ज सादर केला. मात्र, लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसल्याने यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र काल माजी मंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोटनिवडणुकीच्या उमेदवाराचे नाव आम्ही सामनात जाहीर करू, असे विधान केल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटातून लढण्यासाठी ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाचा दबाव असल्याचीही चर्चा आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारू नये यासाठी शिंदे गटाने जाणीवपूर्वक पालिका आयुक्तांवर दबाव टाकल्याची कुजबुज पालिका कर्मचारी संघटनांमध्ये सुरू आहे.
ऋतुजा लटके यांनाही ठाकरे गटाऐवजी शिंदे गटातून उमेदवारी देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून समजते.
राजीनामे लवकरात लवकर मंजूर व्हावेत यासाठी अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या पथकाने सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हे देखील वाचा
- ना युती, ना आघाडी | सर्व निवडणुका मनसे एकट्याने लढवणार, बैठकीत मोठा निर्णय?
- बीडमध्ये खळबळ | भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
- ठाकरे आणि शिंदे गटाचे नाव आल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
- Shivsena : उद्धव ठाकरेंना मिळाले नवीन चिन्ह अन् नाव, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय