आजची कविता : मला येऊ द्याना घरी

0
71
आजची कविता

मला येऊ द्याना घरी …
*******

मुलगी गर्भात नखवता
हे जाणावे कुकर्म
काळ्या जेलची दिसे वाट
कुठे फेडाल हे पाप .. ?
मला येऊ द्याना घरी
आता ऊजाडले नवे पर्व
गर्भ राहता मुलीचा
मनी वाटु द्यावा गर्व ..
मुलगी मुलगा दोन्हीही
समान, मनाला आवडे
कशाला पैशात तोलता
आता जड मुलीचे पारडे ..
मुलगी भ्रूण वाचवा गर्भात
तिला हासवा आईच्या नात्यानं
शिकवा पुढेही मुलींना
लाभू दे सरस्वतीचे वरदान ..
*****
डाॅ.रेखा देशमुख, पुणे