बिलासपूर, 26 मार्च : छत्तीसगडमधील गौरेला पेंड्रा मारवाही (GPM) जिल्ह्यातील गौरेला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित महिलेने आपला मुलगा आणि पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
महिलेचा आरोप आहे की, तिच्या 19 वर्षांच्या मुलाने तिच्या खासगी प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
पतीच्या सांगण्यावरून तिच्या मुलाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही महिलेचे म्हणणे आहे.
पोलिसांनी महिलेचा पती आणि मुलाला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
खरे तर महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, खासगी नाजूक प्रसंगाचा हा व्हिडिओ तिच्या पतीच्या सांगण्यावरून बनवण्यात आला होता.
कारण तिचे नवऱ्यासोबत रोज भांडण व्हायचे, या भांडणाला कंटाळून पत्नी बहुतेक वेळा माहेरी राहायची.
काही दिवसापूर्वी महिला सासरी घरी रहायला परतली असता तिच्या १९ वर्षीय मुलाने मोबाईल खराब असल्याचे सांगून आईकडून मोबाईल घेतला होता.
मुलाने मोबाईलवरून आईचा तो न्यूड व्हिडिओ त्याच्या मावशीला पाठवला असल्याचा, आईकडून केला जात आहे.
मुलाचा उद्देश वेगळा होता. त्याला आपल्या आईच्या कृत्याची नातेवाईकांना माहिती द्यायची होती.
याप्रकरणी महिलेवर घाणेरडे काम केल्याचा आरोप पतीकडून केला जात असून याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होतं होती.
मुलाला भांडण संपवायचे होते
आरोपी मुलाच्या म्हणण्यानुसार, नेहमी होणारी भांडणं संपवण्यासाठी मुलाने हा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवला होता.
मुलाने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, मुलाने पाठवलेला व्हिडिओ कसा व्हायरल झाला हे त्याला माहीत नाही.
सध्या गौरेला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आयटी एक्टसह इतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जीपीएम जिल्ह्याच्या अतिरिक्त एसपी अर्चना झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे.
त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.