देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट घेणार : एकनाथ खडसेंची कबुली

Will meet Devendra Fadnavis and Amit Shah: Eknath Khadse's confession

जळगाव : एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला. गिरीश महाजन म्हणाले की, खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांना सांगितले की, आपण तिघे बसून सर्व काही मिटवून घेऊ.

यावर खुद्द आमदार खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, हो… मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना भेटणार आहे.

मी नाशिक येथे एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सांगितले. त्यावर फडणवीस म्हणाले की पुढच्या आठवड्यात तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत. यावर आता एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणाले, आता मिटवायला काय उरले आहे? सर्व प्रकारे त्रास देणे सुरू आहे. ईडी सुरू आहे. सीबीआय सुरू आहे. या सर्व चौकशीला मी प्रभावीपणे सामोरे जाणार असल्याचे खडसे म्हणाले.

अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर तीन तास बसून राहिल्याचं रक्षा खडसेंनी मला सांगितल्याचंही गिरीश महाजन म्हणाले, पण भेटले नाहीत.

याबाबत मी रक्षा खडसे यांना विचारणा केली असता महाजन यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे रक्षा खडसे यांनी मला सांगितले, असेही खडसे म्हणाले.ने आणि एवढा गोंधळ असल्याने मी त्यांना विचारलेच नाही.