Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. आता या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांनी मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतले आहे. त्याचीही चौकशी केली जाईल.
या तपासासाठी एकूण आठ पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक टीमही तिथे असेल. विनायक मेटे यांचे पहाटे 5.05 वाजता निधन झाले. जवळपास तासभर मदत मिळाली नसल्याचा आरोप कार चालकाने केला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मेटे यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचा पूर्ण चुराडा झाला आहे. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या अंगरक्षकालाही गंभीर दुखापत झाली आहे.
सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चालक एकनाथ कदम यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. रसानी पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.
एकनाथ कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून विनायक मेटे यांच्या गाडीचे चालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनीच रात्री बीड येथून सर्वजण मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांना दिली.