वंदे मातरम् वाद | आम्ही भारताची पूजा करत नाही, आम्ही फक्त अल्लाची इबादत करतो : AIMIM आमदार

Vande Mataram Controversy | We don't worship India, we only worship Allah: AIMIM MLA

मुंबई : असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM च्या एका आमदाराने ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताबाबत विधान केले आहे. AIMIM पक्षाचे आमदार मुफ्ती इस्माईल अब्दुल खालिक यांनी म्हटले आहे की, ‘वंदे मातरम’ म्हटल्याने देशाचा सन्मान वाढत नाही आणि सरकारने धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असा कोणताही आदेश जारी करू नये.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सांगितले की, सर्व राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यालयात फोन उचलताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे लागेल.

मुनगंटीवार यांच्या आदेशाला उत्तर देताना महाराष्ट्रातील मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल म्हणाले की, आम्ही भारताची पूजा करत नाही. आम्ही देशाची पूजा करत नाही.

वंदे मातरम्मुळे देशाचा सन्मान वाढणार नाही. हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मंत्र्यांनी सर्वांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. मंत्र्यांनी असा आदेश देऊ नये.

आमदार मुफ्ती इस्माईल अब्दुल खालिक म्हणाले की, वंदे मातरम् म्हणजे आम्ही तुमची पूजा करतो, तर इस्लामनुसार आम्ही फक्त अल्लाचीच इबादत करतो.

मुफ्ती इस्माईल अब्दुल खालिक यांनी सांगितले की, आम्ही अल्लाहशिवाय इतर कोणाची ‘पूजा’ करू शकत नाही. आम्ही फक्त अल्लाहची इबादत करतो.

आम्ही देशाची पूजा करत नाही

इस्माईल म्हणाले, ‘आम्ही देशाची पूजा करत नाही, आम्ही पृथ्वीची पूजा करत नाही, आम्ही इतर कोणाची पूजा करत नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आमच्या धर्मात देशाची पूजा करणे चुकीचे आहे.

हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे मी धर्माच्या आधारावर सांगत आहे. वंदे मातरमने देशाचा सन्मान वाढणार नाही. सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनीही एकदा ‘वंदे मातरम ‘गाण्यास नकार दिला होता आणि त्यांचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

मुनगंटीवार मागे सरकले

दरम्यान, विरोधी पक्षांच्या टीकेनंतर मुनगंटीवार यांनी मंगळवारी माघार घेत सांगितले की, अधिकाऱ्यांनी फोन उचलल्यानंतर ‘वंदे मातरम’ म्हणणे बंधनकारक नाही आणि त्याऐवजी राष्ट्रवाद दर्शविणारा दुसरा समानार्थी शब्द वापरू शकतात.

या आधी त्यांनी म्हटले होते कि, देश अमृतोत्सव साजरा करत आहे. महोत्सवात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना पुढील वर्षी 26 जानेवारीपर्यंत कार्यालयातील फोन उचलल्यानंतर हॅलोऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे लागेल आणि 18 ऑगस्टपर्यंत याबाबत अधिकृत आदेश जारी केला जाईल.