उदगीर: उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढूनच रस्त्याचे काम करावे, या मागणी साठी येथील पत्रकार मागील 15 दिवसापासून छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करीत आहेत.
मात्र प्रशासन या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने पत्रकारांनी आंदोलन तीव्र करीत वरिष्ठ विभागाकडे दाद मागत सदरील काम थांबवा, अन्यथा आम्हास आत्महत्येची परवानगी द्या म्हणताच नगरपालिकेला जाग आली.
त्यांनंतर उदगीर नगर पालिकेने 72 मालमत्ता धारकांना जा. क्र उ नप/5/3/वसुली/0837/2022 ने ता.06/07/2022 ला नोटीस देऊन त्यांना त्यांच्या मालमत्तेची कागदपत्र नगरपालिके कडे 3 दिवसात सादर करा अन्यथा अतिक्रमणं हटविण्यात येईल असे म्हटले आहे.
नगर पालिकेच्या या नोटीस 72 पैकी 60 मालमत्ता धारकांनी घेतल्या त्यांची नावे विलास हणमंत पाटील, विजयकुमार ईश्वरराव पाटील, आदम अजीज मलकजी, सलीम मो. युनूस, संदीप शिवाजी पाटील, नविद जावेद अहमद, चंद्रकांत धुळाप्पा मुचळबे, विनायक प्रल्हाद साळुंके व इतर, सुरेखा श्यामसुंदर मुक्कावार, राम गोपाळराव डोईजोडे व इतर, अनिल रमेश वट्टमवार, केदार उर्फ गुंडप्पा अनिल वट्टमवार, रामराव संग्राम मोमले, अशपाख अहमद अ. खादर, शे. मुश्ताक अहमद खादर, गुणवंत बसवंतराव पाटील, श्रीनिवास दामोदर मालशेटवार, सूर्यकांत किशनराव गबाळे, रतिकांत मधुकर चीद्रे, प्रेमलता रूकमन पेंसलवार, साईप्रसाद सूर्यकांत पाटील, दिनेश त्रिंबक निला, आयशा खानम भ्र.सईद अ.साबेरी, महादेव विद्यासागर स्वामी, नवनाथ मारोती गायकवाड, गोविंद पांडुरंग बिरादार, काशिनाथ गणपत पेन्सलवार, श्याम आदिनाथ खंडालिकर, सुदर्शन नामदेव मोरे, प्रकाश तुळशीराम येरमे, श्रद्धा विद्यासागर चवळे, दिलीप पि. रामराव पेंसलवार, शैलेश दिलीप बेद्रे, विक्रांत पि. विलास भोसले, कलावती राजेंद्र स्वामी, सुभाष बाबाराव होनराव, महम्मद उस्मान म. इब्राहिम, अमित बाबुराव पाटील, अजय बाबुराव पाटील, राम जगदीश सुगंधी, पार्वतीबाई विश्वंभर मठपती, चंद्रकांत धुळप्पा मुचळबे, विश्वनाथ पिराजी झिल्ले, भागीरथी जळबा बनसोड व इतर, राम दत्तू कांबळे रमेश दत्तू कांबळे, अ. गणी अ. नबी, पवन रमेश सोलापूरे, बसवंतराव विश्वनाथराव पाटील, महेश माणिकराव पाटील, अण्णाराव वेंकोबा बिरादार, रावसाहेब पांडुरंग बिरादार, राजकुमार बिरादार, रुक्मिीनबाई माधवराव जवळे, काशिनाथ सदाशिव जवळे, डॉ. शंकर महाळींगप्पा द्वासे, राजू राजेंद्र सांगवीकर व इतर, चंद्रशेखर धोंडीबा भोसले, कमलाबाई अनंतराव सांगवीकर याना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
त्यातील 12 मालमत्ता धारकांनी नोटिसा घेतल्या नाहीत त्यांची नावे खालिल प्रमाणे आहेत. गोपाळराव बाबाराव हांगरर्गे, अनिल जळबा हराळे, दत्तू नामदेव कांबळे, डॉ.योगीराज वैजेनाथ चिद्रे, धनराज मोहनराव मुळे, मिलिंद व्यासकुमार घनपाटी, अशोक बाळासाहेब बिरादार, तुकाराम पांडुरंग बिरादार, तान्याबाई रावसाहेब बिरादार, अनुसयाबाई उद्धव बिरादार व इतर, तान्याबाई रावसाहेब बिरादार, महेश रामराव बिरादार, आश्विन रमेश चनगे या 12 मालमत्ता धारकांनी नोटीस घेतल्या नसल्याचे न.प.चे अभियंता काझी यांनी सांगितले आहे.