मुंबई : तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाही, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी झी 24 तासला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली.
राज ठाकरे काय म्हणाले?
तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाहीय काही. बाकीच्या लोकांचं मला वाईट वाटतं परंतु हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
जर तर मध्ये नकोच जाऊयात भाजपशी युती होईल नाही होईल हा भविष्यातला प्रश्न, साधारण 2014 आणि 2017 च्या टप्प्यात तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा किंवा तुम्ही त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? या प्रश्नावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.