शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार : रामदास आठवले

Thackeray government responsible for attack on Sharad Pawar's house: Ramdas Athavale

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जे आंदोलन झाले, त्या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनांचा विचार करावा. गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.

आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, एसटी कामगारांच्या आक्रोशाची दखल न घेतल्याने हा हल्ला झाला. मात्र असा हल्ला योग्य नसून घटना निंदनीय आहे.

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

तसेच हल्लेखोर एसटी कामगारांना कामावर घेणार नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कामगार कामावर न घेण्याची भूमिकाही चुकीची आहे.

जेएनयू विद्यापीठातील घटनेबाबत विचारले असता आठवले म्हणाले, जेएनयू हे देशातील सर्वात महत्त्वाचे विद्यापीठ असून, अनेक प्रकारचे वाद आहेत.

कालची घटना पाहता, विचारधारा भिन्न असली तरीही प्रत्येकाला आपले काम करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या दोन गटात हा वाद होता. या घटनेची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत कधीच जाऊ दिले नसते. अडीच वर्षांचा फॉर्म्युला लक्षात घेऊन उद्धव ठाकरे भाजपसोबत येण्यास उशीर झालेला नाही, असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत येण्याचे आवाहन केले.