जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यांचा रक्तदाबही कमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
त्याच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचे पथक ते ज्या हॉटेलमध्ये होत्या, त्या हॉटेलमध्ये दाखल झाले. खुद्द सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सुषमा अंधारे यांना भाषणाची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाइन बैठक घेण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.
सुषमा अंधारे सध्या जळगावात मुक्कामी आहेत. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेची जळगावात चर्चा सुरु आहे. या सभेतील त्यांची भाषणे खूप गाजली आहेत. या भाषणांतून त्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत.
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाली आहे. मात्र त्यांच्या सभेला पोलिसांनी मनाई केली होती.
कारण ज्या भागात त्यांची सभा झाली त्याच परिसरात स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
मात्र तरीही सुषमा अंधारे या बैठका घेण्यावर ठाम होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले. सुषमा अंधारे यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
अखेर तणाव वाढत असताना सुषमा यांनी मधला मार्ग काढून ऑनलाइन बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडीदरम्यान सुषमा यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली.
या सगळ्या राजकीय गदारोळा दरम्यान सुषमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांची शुगर लेव्हल कमी झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल झाली.