Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने स्थानिक आमदार, खासदार आणि नेत्यांची 12 सदस्यीय टीम तयार केली आहे. या टीमकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘स्पेशल 12’ शिंदे गटाची टीम
- शिवेसना खासदार गजानन किर्तीकर
- मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर
- खासदार राहुल शेवाळे
- आमदार सदा सरवणकर
- आमदार प्रकाश सुर्वे
- आमदार यामिनी जाधव
- आमदार मंगेश कुडाळकर
- आमदार दिलीप लांडे
- शवंत जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष बीएमसी
- शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे,
- उपनेत्या आशा मामडी
- माजी नगरसेविका कामिनी शेवाळे
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारी या 12 जणांवर असणार आहे. शिवसेनेतील भूकंपानंतर मुंबई महापालिकेची पहिलीच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही.
प्रभाग पुनर्रचना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र या निवडणुका नव्या वर्षात होतील का? हे पाहणे महत्वाचे असेल.