धक्कादायक : विद्यार्थी, स्तनदा आणि गरोदर मातांच्या पोषण आहारात प्लास्टिकचा तांदूळ?

Shocking: Plastic rice in the nutritional diet of students, breastfeeding and pregnant mothers?

चंदगड : चंदगड तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व स्तनदा आणि गरोदर मातांना दिल्या जाणार्‍या मोफत पोषण आहाराच्या तांदळामध्ये प्लास्टिकसदृश तांदूळ भेसळ होत असल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.

चांगला आणि प्लास्टिक तांदूळ विभक्‍त केल्याचा सबळ पुरावा मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील एका शाळेत घडला.

तांदूळ शिजवून खाल्‍लेल्यांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता ‘फूड पॉईझनिंग’ (अन्नपदार्थांची बाधा) झाल्याचे सांगण्यात आले.

या भेसळीबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे मुरकुटेवाडी ग्रामपंचायतीने ठरवले आहे.

प्लास्टिक तांदळाचे होते पीठ

तांदळात भेसळ झाल्याने अनेकांना उलट्या, जुलाब, पोटात दुखू लागले आहे. प्लास्टिक तांदूळ पाण्यात टाकल्यानंतर न उकळताच त्याचे पीठ होते व तांदूळ चिमटीने कुस्करतो.

तसेच त्याची चवही प्लास्टिकसारखी आहे. 50 किलोंच्या पोत्यात तब्बल 10 किलो प्लास्टिक तांदूळ भेसळ केल्याचे निदर्शनास आले आहे.

पोषण आहाराला डॉक्टरांचा नकार

शासकीय पोषण आहार हा उत्कृष्ट व दर्जेदार नसतो. त्यामध्ये भेसळीचे प्रमाण अधिक असल्याने गरोदर व स्तनदा मातांना त्यांचे फॅमिली डॉक्टर पोषण आहार न घेण्याचा सल्‍ला देतात.

त्यामुळे हा मिळालेला पोषण आहार त्यांचे नातेवाईक घेतात किंवा पाळीव जनावरांना खायला घातला जातो.