Shivsena Dasara Melava 2022 : राज ठाकरे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून येणार?

Shivsena Dasara Melava 2022

मुंबई : शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू असतानाच आता दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने या वादाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

दसरा मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात लढत होत आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा उधळून लावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

त्यासाठी शिंदे गटाने दसरा मेळाव्याचेही नियोजन केले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसेचे राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. खुद्द मनसेप्रमुखच दसरा मेळाव्यास ‘प्रमुखपाहुणे’ म्हणून यावेत यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दसरा मेळाव्याच्या वादात नवा ट्विस्ट

दसरा मेळाव्याचे आयोजन कोण करणार यावरून वाद सुरू असतानाच आता या वादात नवा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून आमंत्रित केले जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा ही परंपरा आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्याची रणनीती शिंदे गट आखत आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 56 वर्षांची परंपरा आहे

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ५६ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क या मैदानावरून हिंदुत्वाची भूमिका मांडली आणि ती संपूर्ण देशात गेली.

त्यामुळे हिंदुत्वाचा विचार करून या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदे गटातून बोलले जात आहे.

या मेळाव्याला राज ठाकरेंसारख्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाने दिले आहेत.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे

काहीही झाले तरी शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे

शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा झाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात इतर पक्षांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. ‘वारसा हा वास्तुकलेचा नसून विचारांचा आहे’, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.