मुंबई : एकनाथ शिंदे सरकार सत्तेत येऊन तब्बल महिनाभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता खातेवाटपाची चर्चा सुरू झाली आहे.
भाजप मोठी खाती स्वत:कडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी खाते वाटप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सायंकाळपर्यंत खात्यांचे वाटप होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीस हे महसूल विभागासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटही महसूल विभागासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. अजूनही काही खात्यांमध्ये ओढाताण सुरु असल्याचे बोलले जात आहे. आज दुपारपर्यंत हा तिढा सोडवला जाईल. दोन्ही बाजूनी तिढा सोडविण्याचा प्रयत्न झाला तर संध्याकाळपर्यंत खाते वाटप होईल.
सूत्रांनी संभाव्य खाते वाटपाची यादी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त खाती असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे उर्जा, विखे-पाटील यांना महसूल खाते आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना उद्योग खाते मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही असतील संभाव्य खाती व मंत्री?
1) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री (नगरविकास)
2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
3) राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, सहकार
4) सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
5) चंद्रकांतदादा पाटील – सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास
7) गिरीश महाजन – जलसंपदा
8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
9) दादा भुसे- कृषी
10) संजय राठोड- ग्राम विकास
11) सुरेश खाडे – सामाजिक न्याय
12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी
13) उदय सामंत – उद्योग
14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
18) अतुल सावे – आरोग्य
19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क
20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय