मुंबई : उद्धव ठाकरे गटानंतर आता एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला पर्याय द्यावा लागणार आहे. त्यासाठी आज बैठकीचे सत्र सुरू आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे यांच्या उपस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या चमूसोबत बैठक झाली. यावेळी कॅबिनेट मंत्री नारायण राणेही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गट देणार उमेदवार?
वर्षावर दुसरी बैठक सायंकाळी 7 वाजता होणार आहे. पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत कोणते पर्याय द्यायचे याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
Uddhav Thackeray | निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसले : ठाकरे
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करायचा की नाही, यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाठ यांनी दिली.
दरम्यान, दसरा मेळाव्याच्या वेळी व्यासपीठाजवळ भली मोठी तलवार ठेवण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटाने धनुष्यबाण गोठविल्यास ते निवडणूक आयोगाकडे तलवार चिन्हाची मागणी करणार असल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाने कोणते पर्याय दिले?
त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय उद्धव ठाकरे गटाने दिला आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संघाच्या नावांचा पर्याय दिला आहे.