नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शिंदे-भाजपमध्ये धुसफूस होणार आणि सरकार पडणार त्यामुळे मध्यावधी निवडणुका लवकरच होतील, असे संकेत दिले आहेत.
मात्र भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीच राज्यात गोंधळाची परिस्थिती असल्याचे सांगितले. म्हणूनच रावसाहेब दानवे कधी कधी खरे बोलतात. हे मध्यावाधीचे संकेत समजले पाहिजे. शिंदे-भाजप सरकार 100 टक्के पडेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दानवे काय म्हणाले?
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथे एका प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी रावसाहेब दानवे बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते, पण अशी जादू झाली की अडीच वर्षांत सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय स्थिती काय असेल हे सांगता येत नाही.
सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळाची आहे. काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरे बोलतात. दोन महिन्यांनंतर काहीही होऊ शकते. म्हणजे सरकार पडू शकते, याचा अर्थ त्यांनी मध्यावधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडणार असल्याची खात्री असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
येत्या काही दिवसांत शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा होणार आहे. त्यानंतर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा दावा असल्याचे बोलले जात आहे.
कथित पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मात्र मी त्या संदर्भात नाही तर माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो असल्याचे राऊत म्हणाले. मुंबईला गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही राऊत म्हणाले.