Sambhaji Raje: महाराज, तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय : संभाजीराजेंचं भावनिक ट्विट

Sambhaji Raje: An emotional tweet of Sambhaji Raje with a photo of him bowing before Maharaj

मुंबई: संभाजी राजे यांनी राज्यसभेच्या सहाव्या रिक्त जागेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्वपक्षीय आमदारांना पाठिंबा देण्याचे पत्र त्यांनी लिहून दिले आहे.

त्यानंतर संभाजी राजेंनाही शिवसेनेने ऑफर दिली होती. मात्र, शिवसेनेच्या प्रस्तावाला संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने सहाव्या जागेवरून संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे संभाजी राजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, संभाजी राजे छत्रपती यांनी आज एक सूचक ट्विट केले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होणारा फोटो संभाजीराजेंनी शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना संभाजीराजेंनी लिहिलं, “महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी..”

संभाजी राजेंनी केलेल्या या ट्विटमुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजी राजे स्वतंत्र निवडणूक लढवणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोपर्यंत सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवार जाहीर करत नाहीत, तोपर्यंत संभाजी राजे प्रतिक्रिया देणार नाहीत.

शिवसेना आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे दोन उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत आणि कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आज दुपारी एक वाजता विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

सहाव्या राज्यसभेच्या जागेसाठी कोण उमेदवार असेल यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना स्थापन केल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती.

त्यांनी शिवसेनेला शिवसेना पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र शिवसेनेने त्यांना पक्षात प्रवेश देण्याची अट ठेवली होती.

त्यामुळे स्वतंत्र धनुष्यबाण सांभाळणारे युवराज संभाजी राजे छत्रपती आणि शिवसेना यांच्यातील वादाने कळस गाठला होता.

अखेर शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. आता संभाजी राजे अपक्ष उमेदवारी दाखल करतात का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.