बंडखोरांनी सांगावे, राजीनामा द्यायला तयार, वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 भावनिक मुद्दे

Rebels should tell, ready to resign, read 10 emotional points in Uddhav Thackeray's speech

मुंबई, 22 जून : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या समर्थक आमदारांसोबतएकनाथ शिंदे राज्याबाहेर आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 34 शिवसेना आमदार असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी या लाईव्हच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यातील प्रमुख मुद्यांचा धावता आढावा घेऊ या. या लाईव्हमध्ये त्यांनी भावनिक आवाहनावर भर दिला.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे

  • हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांत गुंतलेले आहेत. विधानसभेत हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. तुम्ही हिंदुत्वापासून दूर गेला आहात असे तुम्हाला कशामुळे वाटले? शिवसेना आजही हिंदुत्ववादी आहे.
  • अडीच वर्षांच्या सत्तेत जे मिळाले बाळासाहेबांचे आशीर्वाद म्हणून स्विकारले. मला सत्तेची लालसा नाही.
  • शरद पवार यांच्या सांगण्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचा विश्वास होता. प्रशासनानेही माझी काळजी घेतली.
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. आज माझी कमलनाथ यांच्याशी चर्चा झाली.
  • माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर? गुजरातमध्ये जाऊन चर्चा कशाला? मी राजीनामा देण्यास तयार आहे.
  • ज्यांना मी नको आहे त्यांनी पुढे येऊन सांगावे, मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी आज वर्षा बंगल्यावरून मातोश्रीला जायला तयार आहे.
  • आज मी माझा राजीनामा तयार करत आहे. राज्याबाहेर जाऊन बसलेल्या आमदारांनी पुढे येऊन माझा राजीनामा राज्यपालांकडे सोपवावा.
  • शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी आनंदाने राजीनामा देण्यास तयार आहेत. जर कोरोना संसर्ग झाला नसता तर मी राजीनामा दिला असता.
  • शिवसैनिकांनी मी शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी योग्य नाही, असे सांगावे, मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार आहे.
  • शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आले.
  • तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असे समोर येऊन सांगा मी राजीनामा देईन. हे माझे नाटक नाही. माझ्यासाठी नंबर गेम व पद दुय्यम आहे.