Rajya Sabha Election Result : एक राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, महाराष्ट्र अनाजीपंतांना स्वीकारणार नाही’, दीपाली सय्यद

Rajya Sabha Election Result

Rajya Sabha Election Result | मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवरून सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपमध्ये खडाजंगी झाली. 10-15 दिवस चाललेल्या या कुस्तीत अखेर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली.

या विजयानंतर भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. त्याला आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, असा टोला शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या भाजपला दीपाली सय्यद यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.

त्यात त्या म्हणाल्या की, एका राज्यसभेणे मुख्यमंत्री होऊ शकत नाही. एक राज्यसभेने मुंबईचा महापौर होऊ शकत नाही. एक राज्यसभेने कोल्हापूर पोटनिवडणूक जिंकू शकत नाही. 106 किंवा 130 असू द्या पण महाराष्ट्र अनाजी पंत स्वीकारणार नाही.

तुम्ही काहीही केले तरी तुम्ही परत येणार नाही. दीपाली सय्यद म्हणतात, जगातील सर्वात मोठा पक्ष एका राज्यसभेवर बसत नाही.

दरम्यान, काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल आज सकाळी जाहीर झाला. भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत हे पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले.

भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात चुरशीची लढत झाली. धनंजय महाडिक दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आवश्यक कोटा मिळवून विजयी झाले होते.