कराड : ‘सुधारककार’ गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्यावतीने या वर्षीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ संपादक राजा माने यांना ख्यातनाम वक्ते व विचारवंत प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांच्या हस्ते आगरकरांच्या टेंभू या जन्मगावी प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंन्सल, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टेंभू गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज भोईटे भूषविले. यावेळी तहसिलदार विजय पवार ,उद्योजक रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सन २०२२ चा गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या बरोबर सातारा येथील दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, दैनिक सकाळ पुणे उपसंपादक आशिष तागडे, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, झी २४ तास चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तुषार तपासे, दैनिक पुढारी कोल्हापूरच्या स्नेहा मांगुरकर यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे.