Raj Thackeray : ठाण्यातील सभेत दाखवली तलवार; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

Raj Thackeray's appeal to all Hindus, orders to activists

ठाणे : ठाण्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात तलवार उपसल्याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मंगळवारी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले होते.

तत्पूर्वी, ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी सभेच्या व्यासपीठावर राज ठाकरे यांचा सत्कार केला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी भेट दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून वर हात करून दाखविली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील सभेत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तलवार दिली होती. राज यांनी ती तलवार म्यानातून बाहेर काढली होती.

त्यामुळे नौपाडा पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय म्हणाले याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले जाईल आणि उत्तर पूजेनंतर विसर्जन होईल.

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन का केले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात सभा घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फटकारले. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

त्याच सभेत त्यांनी आव्हाड यांच्यावर टीका करत त्यांनी सापाची उपमा दिली. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी राजची मिमिक्री कलाकार जॉनी वॉकरशी केली.