प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, न्यूड व्हिडिओ काढून लग्नानंतरही करीत राहिला भयंकर मागणी

Crime News

ग्वाल्हेर : मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधील छतरपूर येथील एका 32 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका प्राध्यापकाने या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

अनेक वर्षांपासून तो अश्लील व्हिडिओ बनवून तिचे शोषण करत होता. तसेच आरोपीने लग्न केल्यानंतरही दबावामुळे पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सध्या पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर येथे राहणारी एक विद्यार्थिनी काही वर्षांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये शिकण्यासाठी आली होता.

ती इथे मुलींच्या वसतिगृहात भाड्याने राहायची. यादरम्यान विद्यार्थिनीची महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अंगद सिंग याच्याशी ओळख झाली.

असाईनमेंटमध्ये चांगले गुण देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाने तिला 1 दिवस फ्लॅटवर बोलावून बलात्कार केला.

यादरम्यान आरोपी प्रोफेसरने न्यूड व्हिडिओही बनवला आणि तेव्हापासून ब्लॅकमेल करून त्याने पीडित तरुणीचे लैंगिक शोषण सुरू ठेवले.

समाजाच्या भीतीने ती गप्प राहिली. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीचे लग्न झाले. तरीही आरोपी प्राध्यापकाने तिला ब्लॅकमेल करणे सुरुच ठेवले.

त्यामुळे पीडितेने सिरोल पोलीस ठाणे गाठून आरोपी प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असे पोलिसांनी सांगितले आहे.