मुंबई : कर्नाटकात हिजाबचा मुद्दा लावून धरल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचे ‘राज’कारण सुरू झाले आहे.
शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगितले की, आता मशिदींवरील भोंगे काढावे लागतील. यातून राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा धार दिली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर शिवाजी पार्कवर मनसे कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना राज म्हणाले, मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे.
प्रभू राम लल्लाच्या दर्शनासाठी मी लवकरच अयोध्येला जाणार आहे. मात्र, त्यांनी अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली नाही.
Raj Thackeray asks Maha govt to remove loudspeakers from mosques, warns of playing 'Hanuman Chalisa' in front of mosques
Read @ANI Story | https://t.co/gQx4IkLP85#Maharashtra #Mosque #HanumanChalisa #RajThackrey pic.twitter.com/wtFAJlBF80
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022
सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, मी नमाजच्या विरोधात नाही, पण सरकारने मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय घ्यावा. मी फक्त एक इशारा देत आहे. लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजविले जातील.
ते म्हणाले की, उत्तर प्रदेशची प्रगती होत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. महाराष्ट्रातही असाच विकास हवा आहे. अयोध्येला जाईन, पण आज कधी जाईन हे सांगणार नाही, मी सतत हिंदूहित आणि हिंदुत्वावरही बोलेन. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे.
जातीत विभागले तर हिंदू कसे होणार
मुंबईतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत शरद पवारांनी जातीवाद वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली. आपण जातीच्या राजकारणातून बाहेर पडलो नाही तर हिंदू कसे होणार?
उद्धव आणि पवारांवर सडकून टीका
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या युतीसाठी मतदारांनी शिवसेनेला मतदान केले नाही.
राज म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांना समजले की शिवसेनेशिवाय कोणाचेही सरकार होणार नाही, म्हणून त्यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागायला सुरुवात केली.
शिवाजी पार्कवरून सरकारला खडे बोल सुनावले
शिवाजी पार्कमधील सभेत राज ठाकरे म्हणाले, ‘मशिदींमधले लाऊडस्पीकर इतके जोरात का वाजवले जातात? हे थांबवले नाही तर मशिदीबाहेर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाईल. ते म्हणाले, मी प्रार्थना किंवा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे.
मुस्लिम भागात छापे टाकावेत
मुंबईतील मुस्लिम भागातील मशिदींवर छापे टाकण्याचे आवाहन ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. राज ठाकरे म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना मुस्लिम झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर छापे टाकण्याचे आवाहन करतो.
या झोपड्यांमध्ये पाकिस्तानी समर्थक राहत आहेत. मुंबई पोलिसांना माहित आहे की तिथे काय चालले आहे, आमचे आमदार त्यांचा वापर व्होटबँकेसाठी करत आहेत, अशा लोकांकडे आधारकार्डही नाही, पण आमदार त्यांचे आधारकार्ड बनवून घेत आहेत.