पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर नमाज, हनुमान चालिसाची परवानगी हवी : फहमिदा हसन खान

Prayers outside PM's residence, permission for Hanuman Chalisa required: Fahmida Hasan Khan
Prayers outside PM's residence, permission for Hanuman Chalisa required: Fahmida Hasan Khan

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घर ‘मातोश्री’समोर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरला होता.

मात्र, लोकांच्या संतप्त भावनांनंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आता राणा दाम्पत्याच्या मागणीला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा आणि नवकार पठण करण्याची परवानगी मागितली.

उत्तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा फहमिदा हसन खान यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून वेळ मागितली आहे.

फहमिदा हसनने पत्रात लिहिले आहे की,मि  नेहमी हनुमान चालिसाचे पठण करते आणि तिच्या घरी दुर्गेची पूजा करते. मात्र, देशात ज्या प्रकारे महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे, ते पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागे करणे गरजेचे आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा फायदा होत असेल, तर त्यांना पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थाना समोर जाऊन नमाज, हनुमान चालीसा आणि दुर्गापाठ करायचा आहे.

गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात फहमिदा हसन यांनी म्हटले आहे की, मी तुम्हाला विनंती करतो की मला देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर नमाज, हनुमान चालीसा, नवकार मंत्र, गुरु ग्रंथ आणि नोव्हिनोचे पठण करण्याची परवानगी द्या. तसेच वेळ आणि दिवस मला कळवा, असे पत्रात म्हटले आहे.