मुंबई : PM kisan Yojna (पीएम किसान योजनेच्या) 11 व्या हप्त्याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे.
10 हप्ता जमा होऊन चार महिने झाले आहेत त्यामुळे 11 हप्ता आता कोणत्याही दिवशी ( Farmer) शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होईल.
असे असले तरी (Central Government) मोदी सरकारने यासाठीही एक मुहूर्त साधलेले आहे. यापूर्वीचा 10 हप्ता बरोबर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
आता 11 व्या हप्त्यासाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होऊ शकतात.
गतवर्षीही मे महिन्यातच ही रक्कम शोतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती.
राज्य सरकारकडून पात्र याद्यांची पूर्तता
पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्राची योजना असली तरी राज्यातील यंत्रणेच्या माध्यमातून लाभार्थी ठरण्याची प्रक्रिया आहे.
त्याच अनुशंगाने 11 हप्त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या याद्या केंद्राकडे सपूर्द केल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. गतवर्षीही 15 मे ला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती.
तर समजा तुम्हीही आहात पात्र
राज्य सरकारने सपूर्द केलेल्या यादीमध्ये तुमचेही नाव आहे का? याची माहिती घेतल्यास खात्रीशीर तुम्हाला लाभ मिळणार आहे.
यासाठी तुम्हाला तुमचे पीएम किसानचे खाते चेक करावे लागणार आहे.
यावर Rft Signed By State For 11th Installment असा उल्लेख असेल तर तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार यात कोणतीच शंका नाही.
हप्ता जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरवात
पीएम किसान खात्याची तपासणी करताना जर Waiting For Approval By State असा एसएमएस असेल तर राज्य सरकारकडून पूर्तता झालेली नाही.
जर FTO is Generated and Payment Confirmation is Pending असा SMS असेल तर मात्र, आपल्या खात्यामध्ये 11 हप्ता जमा होण्याची प्रक्रिया ही सुरु झाली आहे.
आता e-KYC करणे गरजेचे
पीएम किसान योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता e-KYC करुनच घ्यावे लागणार आहे.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता 31 मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली असली तरी ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे.
CSC केंद्र किंवा लाभार्थ्याचे खाते ज्या बॅंकेत आहे त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
2 हजार रुपयांचे वर्षात 3 हप्ते सरकारने ठरवून घेतले आहेत.
देशातील तबब्ल 12 कोटी 50 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.