Pankaja Munde Vs Devendra Fadnvis । राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात भाजप आणि मित्रपक्षांच्या चार ते पाच जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मी कोणाशीही बोलले नाही. निवडणुका आल्या की माझे नाव पुढे येते. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या सर्व पदांसाठी पात्र आहेत. विधान परिषदेसाठी माझा त्यांना पाठिंबा आहे. हा निर्णय केंद्राकडून घेतला जात असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांनीही सावध पवित्रा घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. फडणवीस खरंच पंकजा मुंडेंना साथ देतात का? आता पंकजा मुंडे यांचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाला कि त्यांना पुनः एकदा सापळ्यात अडकवले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
मार्ग सोपा वाटत नाही
एकीकडे फडणवीस यांनी आपण पंकजा यांच्या विरोधात नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यासोबतच निर्णयाचा चेंडू केंद्राकडे सोपवून फडणवीस यांनी आपले हात झटकले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या बाबत जे काही होईल याला केंद्रीय नेतृत्व जबाबदार असल्याचा इशारा पवित्रा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीस निर्णय प्रक्रियेत नाहीत असे भासवत आहेत, असा पंकजा मुंडे समर्थक दावा करत आहेत.
पंकजा मुंडेंच्या बाबतीत जे काही कट झाले. जिथे संधी नाही तिथे फडणवीस आहेत, अशी चर्चा मुंडे समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे आपण सर्व पदांसाठी पात्र आहोत असा प्रतिवाद त्यांनी आधीच केला आहे.
केंद्र निर्णय घेईल असे सांगून देवेंद्र फडणवीस सोईस्कर भूमिका घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यासाठी सापळा लावला जात आहे, अशी भूमिका बळावत आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी अडचण
पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवायचे असेल तर ते त्यांना इथेच ठेवतील. त्यांना विधानपरिषदेवर पाठवले तर विरोधी पक्षनेते कोण होणार? हा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण प्रवीण दरेकर हे निवृत्त झाले आहेत.
प्रवीण दरेकर आणि पंकजा मुंडे यांच्यात सरस कोण? असा प्रश्न निर्माण झाल्यावर पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येईल. नियमानुसार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता हा ज्येष्ठ असतो. तिथे मोठी अडचण होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मला असे वाटत नाही
मी विधानपरिषदेवर जावे अशी कार्यकर्त्यांची ‘मन कि बात’ असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. कारण त्यांना जनतेचा पाठिंबा आहे. विधान परिषदेसाठी सर्व कागदपत्रे तयार करण्यास सांगितल्यानंतर त्यांचे नाव वगळण्यात आले.
पक्षांतर्गत राज्य पातळीवर जे काही राजकारण सुरू आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला उत्तर म्हणून आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.
याचा अर्थ पंकजा यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी किंवा त्यांचे नाव वगळावे यासाठी सापळा लावला जाईल असे पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांनाही वाटत आहे.
पंकजाही शाश्वत नाहीत
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा संघर्ष अनेकदा उघड झाला आहे. त्यांनी काहीही लपवले नाही. कारण औरंगाबादचा मोर्चा हा स्थानिकांचा मोर्चा असल्याचं पंकजा म्हणाल्या होत्या.
त्यामुळे फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सावध पवित्रा घेतला. मात्र केंद्रीय पातळीवर निर्णय कधी होणार? राज्य पातळीवर शिफारशी आल्यावरच निर्णय घेतला जातो.
राज्य पातळीवरील राजकारणाचा विचार करता पंकजा मुंडे यांचे नेतृत्व राज्यात होते. त्यांच्या पराभवामुळे त्यांना अंतर्गत राजकारणातून राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली.
त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. पंकजा म्हणाल्या, मी विधानपरिषदेवर जावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
याचाच अर्थ पंकजा मुंडे यांची इच्छा असली तरी पक्ष ठरवेलच याची खात्री नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा नाही तर ‘मन कि बात’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चुका सुधारण्याची संधी मिळेल
2019 च्या निवडणुकीत फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांना दूर ढकलले. काहींना तिकीट नाकारण्यात आले. काही जणांना ठरवून पाडण्यात आले.
तेव्हा ओबीसी आणि इतर समाजाच्या नेत्यांना खाली आणण्याची फडणवीस यांची भूमिका असल्याचे वातावरण होते. त्याचा फटका फडणवीस आणि भाजपला बराच महागात पडला.
विदर्भात 12 ते 13 आमदार पडले. विनोद तावडे आणि राम शिंदे पडले. दोन वर्षांत फडणवीसांना केंद्राकडून फारशी साथ मिळाली नाही. अजित पवारांचा सकाळचा प्रयोग फसला. फडणवीस यांच्या काळात व्यक्तीकेंद्रित राजकारण सुरू झाले.
त्याचा फटका पार्टीला सहन करावा लागला. फडणवीसांना चूक सुधारण्याची संधी आहे. बहुजन समाज हा भाजपचा जनाधार अबाधित असल्याचे दाखवण्याची संधी आहे.
भीतीपोटी भूमिका जाहीर केली असावी
पंकजा मुंडे यांची केंद्राने दखल घेतली आहे. त्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे महिला आणि ओबीसी म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं ही फडणवीसांना भीती असावी म्हणून त्यांनी भूमिका जाहीर केली असेल, असेही बोलले जात आहे.