Home Blog Page 320

Crime News : प्रेम प्रकरणातून तलवारीने सपासप वार करत खून

Filed a case against a young man for raping a young woman under the pretext of marriage

पुणे : प्रियकर-प्रेयसीच्या वादात प्रियकराच्या मित्राचा नाहक बळी गेला. ही घटना शुक्रवारी रात्री लोकमान्यनगर येथे घडली. प्रेयसीच्या मामाने तलवारीने सपासप वार करत हा खून केला.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुल वाळंजे यानी फिर्याद दिली आहे. तर महेश गायकवाड असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एक 22 वर्षीय तरुणी एका दागिण्यांच्या दुकानात काम करते, तर राहुल हा तीचा प्रियकर आहे.

तिला वडिल नसल्याने तीचा संभाळ तिचे मामा करतात. मामांचा ऑफसेट प्रिटींगचा व्यवसाय आहे. संबंधीत तरुणीला तिच्या दुकानातील व्यवस्थापक गाडीवरुन घरी सोडताना राहुलने बघितले होते.

याचा जाब तिला काल रात्री राहुलने लोकमान्यनगर येथे विचारला. त्याने केलेल्या शिवीगाळीमुळे ती भेदरली होती.

तिने फोन करुन तिच्या मामांना बोलावून घेतले. यावेळी मामांचे आणि राहुलचे वाद झाले.

ही भांडणे सोडवण्यासाठी राहुलचा मित्र महेश गायकवाड मध्ये पडला. त्याच्यावर रागाच्या भरात मामांनी तलवारीने सपासप वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मृत झाला.

Nokia चा 6 हजार रुपयात जबरदस्त Smartphone, एकदा चार्ज केला तर 2 दिवस चालणार

Nokia चा 6 हजार रुपयात जबरदस्त Smartphone, एकदा चार्ज केला तर 2 दिवस चालणार

नोकियाने (Nokia) जानेवारीमध्ये झालेल्या CES 2022 इव्हेंटमध्ये एंट्री-लेव्हल Nokia C200 जबरदस्त स्मार्टफोनची घोषणा केली. आता हा स्मार्टफोन अधिकृतपणे यूएसमध्ये कमी  किमतीत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. डिव्हाइस V-notch डिस्प्ले, Android 12 OS आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यात असणार आहे.

Nokia C200

Nokia C200 Specifications

किंमतीच्याबाबतीत Nokia C200 हा यूएस मार्केटमधील सर्वात स्वस्त Android 12 फोनपैकी एक आहे. परंतु खरेदी करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की कॅरिअरचे प्रीपेड मॉडेल आहे. Nokia C200 720 x 1560 पिक्सेलच्या HD+ रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा LCD डिस्प्ले प्रदान करत आहे.

Nokia C200 ची किंमत $79.99 (अंदाजे रु 6,200) आहे. 3GB RAM + 32GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. हा एक प्रीपेड फोन आहे जो TracFone नेटवर्कवर लॉक केलेला आहे आणि सध्या यूएसमध्ये ऑनलाइन लिस्टेड आहे. राखाडी शेडमध्ये हा उपलब्ध आहे.

Nokia C200 Camera

हे लक्षात घेतले पाहिजे की  V-notch डिस्प्ले आहे ज्यात नोकिया ब्रँडिंग आहे. याच्या मागे 13MP मुख्य सिंगल कॅमेरा ऑटो-फोकस सपोर्टसह येतो. त्यासोबत एलईडी फ्लॅश आहे. तसेच सेल्फी  8MP आहे.

Nokia C200 Battery

या फोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेस आहे आणि 3GB/32GB कॉन्फिगरेशन आहे. हा कदाचित MediaTek Helio A22 चिपसेट आहे.

ज्याची घोषणा CES इव्हेंटमध्ये त्या चिपसोबत करण्यात आली होती. स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी आहे, जी दोन दिवसांपर्यंत चालू शकते. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP52 रेटिंग आहे.

Amazon ची ही ऑफर फक्त अडीच हजारात आयफोन-१२ तुमच्या हातात

तुम्हाला आयफोन-१२ खरेदी करायचा विचार असेल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. कारण डील ऑफ द डे नुसार AMAZONनं तुम्हाला आज एक मोठी सवलत देऊ केली आहे. म्हणजे आता बाजारात आयफोन-१३ उपलब्ध असला.

आयफोन-१४ बाजारात येत असला तरी आयफोन -१२ ची अजूनही पसंती कमी झालेली नाही. त्यामुळेच एका जबरदस्त ऑफरबद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय.

आयफोन १२ च्या ६४ जीबी स्टोअरेज असणारा मोबाईल आता AMAZON डील ऑफ द डेनुसार जवळपास ५४,९०० रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.

याशिवाय आयफोन१२ वर तुम्हाला ११,४०० चा एक्स्चेंज बोनसही दिला जातोय. मात्र त्यासाठी तुमच्या फोनची कंडिशन आणि मॉडेल लेटेस्ट असायला हवे.

त्यासाठी महिन्याला २५८४ रुपयांचा १२ महिन्यांसाठी नो कॉस्ट emi ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय फेडरल बँक किंवा बँक ऑफ बड़ोदाचं क्रेडिट कार्ड असणाऱ्या ग्राहकांना तात्काळ १० टक्के सवलत मिळेल. त्यामुळे आयफोन-१२ घ्यायचा विचार असेल तर आजचा दिवस सुवर्णसंधीचा आहे… विचार नक्की करा.

झटका आणि चटका महाराष्ट्रात अनेकांना द्यावा लागणार : संजय राऊत

Sanjay Raut : Shinde-BJP government will fall? Sanjay Raut's big claim

डोंबिवली : मिसळ ही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आहे. या मिसळ मध्ये एक झटका आहे. हा स्वाभिमानाचा झटका उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि हा झटका आणि चटका आपल्याला महाराष्ट्रात अनेकांना द्यावा लागणार आहे असा झणझणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि भाजपला लगावला. डोंबिवली त आयोजित मिसळ मोहोत्सवात शनिवारी खासदार राऊत यांनी उपस्थिती लावली होती.

भाऊ चौधरी फाऊंडेशनचे अभिषेक चौधरी, श्री आराध्या ग्रुप आणि शिवसेना यांच्यावतीने डोंबिवली तील सावळाराम क्रीडा संकुलात भव्य तीन दिवसीयमिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाला दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. व्यासपीठावर भाऊ चौधरी, गोपाळ लांडगे, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खासदार राऊत यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनसे आणि भाजप पक्षाला वरील टोला लगावला. पुढे ते म्हणाले, मिसळ ही चवदार आहे ती आपली संस्कृती आहे. पण ज्या प्रकारे आज राजकारण सुरू आहे ती आपली संस्कृती नाही.

महाराष्ट्रात सत्ताधारी, विरोधक, विविध विचारांच्या पक्षाचे लोक ही एकमेकांच्या विरुद्ध टीका करत राहिले. पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुडाचे, द्वेषाचे आणि कंबरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नव्हते.

या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार आणि शिवसेनाप्रमुखांमध्ये कितीतरी वाद झाले आहेत. पण ज्या पध्दतीने राजकारण भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन चार वर्षात सुरू केले आहे ते राज्य आणि देशाला परवडणारे नाही.

हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्र मध्ये आहे आणि एका ओवेसीला उत्तर प्रदेश मध्ये ज्यापद्धतीने वापरण्यात आले, निवडणुका जिंकण्यासाठी, त्याचपद्धतीने नवं हिंदू ओवेसींना महाराष्ट्रामध्ये शिवसेना याच्याविरुद्ध लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

औरंगाबाद येथे मनसेची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने शहरात बॅनर लागले असून राज यांना हिंदुहृदयसम्राट संबोधले गेले आहे. यावर राऊत म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, कोणी किती नकला केल्या शिवसेना प्रमुखांच्या तरी शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट एकच.

डोंबिवलीकरांनी या महोत्सवात दुसऱ्या दिवशीही गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, कल्याण नाशिक, ठाणे, पारनेर, कोकणातील मिसळीची चव खवय्यांना चाखायला मिळाली.

खासदार राऊत यांनी महोत्सवात मिसळचा आस्वाद घेतला. दोन वर्षांनी सगळे एकत्र आलो, तोंडावर मास्क नाही आणि तोंड चालू आहे. हे असेच वातावरण राहायला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे संकट आपण पार केल असले तरी खबरदारी घ्यायची गरज आहे. खाते रहो असे आवाहन त्यांनी यावेळी खवय्यांना केले.

Maharashtra Corona Update: महाराष्ट्राच्या चिंतेत भर; कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Maharashtra Corona Update: Add to Maharashtra's worries; Large increase in the number of active patients with corona

मुंबई : गेल्या महिन्यात कोरोना संसर्ग (corona infection) आटोक्यात आल्यावर कोरोना निर्बंधापासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. राज्य सरकारने राज्यातील सर्वच निर्बंध हटवून काही काळानंतर मास्कमुक्तीही केली.

मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ (corona new patients) होत असून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आज शनिवारी ३० एप्रिलला राज्यात १५५ नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे.

सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ९९८ वर पोहोचली आहे. तर आज शनिवारी कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची (corona death) नोंद करण्यात आलीय. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा १,४७,८४३ वर गेला आहे.

दरम्यान, शनिवारी १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७७,२८,८९१ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.११ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर मृत्यूदर १.८७ एवढा झाला आहे. लॅबमध्ये आजपर्यंत दाखल केलेल्या ८,०१,८८,१४५ नमुन्यांपैकी ७८,७७,७३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या विभागात नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महानगरपालिका क्षेत्र – एमसीजीएम, ठाणे, टीएमसी, नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, पालघर, वसई-विरार महानगरपालिका, रायगड, पनवेल महानगरपालिका – ११५ नवे कोरोना रुग्ण

नाशिक विभाग – नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, अहमदनगर, अहमदनगर महानगरपालिका, धुळे, धुळे महानगरपालिका, जळगाव, जळगाव महानगरपालिका, नंदुरबार – २ नवे कोरोना रुग्ण

पुणे विभाग : पुणे, पुणे महानगरपालिका, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर महानगरपालिका, सातारा – २७ नवे कोरोना रुग्ण

कोल्हापूर विभाग : कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली, सांगली महानगरपालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी – एका नव्या कोरोना रुग्णाची नोंद

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद, औरंगाबाद महानगरपालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महानगरपालिका, – ३ नवे कोरोना रुग्ण

लातूर विभाग : लातूर, लातूर महानगरपालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महानगरपालिका – २ नवे कोरोना रुग्ण

अकोला विभाग : अकोला, अकोला महानगरपालिका, अमरावती, अमरावती महानगरपालिका, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, – ४ नवे कोरोना रुग्ण

नागपूर विभाग : नागपूर, नागपूर महानगरपालिका, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर महानगरपालिका, गडचिरोली – एका नव्या कोरोना रुग्णाची नोंद

कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Big News Maharashtra Crisis | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. उद्धव यांचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेसचे निरीक्षक म्हणून कमलनाथ यांना दिल्लीहून मुंबईला पाठवण्यात आले आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर कमलनाथ यांनी काँग्रेस आमदारांची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि.30: कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.

ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस शुभेच्छा दिल्या आहेत.

आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. दोन वर्ष तर देशावरच कोरोना विषाणूचे संकट होते, पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग – गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले.

शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवर पण कौतुक झाले.

संकटातच खरी परीक्षा होते असे म्हणतात, त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती किंवा विषाणूच्या आक्रमणात प्रशासनाने अगदी तळागाळापासून अतिशय धीराने आणि हिमतीने काम केले, त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते.

महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत.

या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली.

या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे.

आज दुर्देवाने स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या या तमाम महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची कामगिरी सुरू आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून ओळखला जातो.

एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे काही केवळ किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले असे नाही. महाराष्ट्राने पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचेही लक्ष वेधले आहे.

आरोग्याची पुढील काळातली आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे नियोजन केले आहे. खेडी, शहरे स्वच्छ असावीत, सर्वांना व्यवस्थित नळाने पाणी मिळावे, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, शहरांचे आराखडे हे पुढील काही वर्षांच्या विकासाचा अदमास घेऊन तयार करावेत.

विकेल तेच पिकेल असे ठरवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, सौर ऊर्जेचा वापर, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे.

संघराज्य व्यवस्थेचा आम्ही सन्मानच करतो. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि पार पाडतही आहोत.

मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील माझे तमाम बंधू आणि भगिनी हे ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देणारे सगळे प्रयत्न हाणून पाडतील.

माझे सर्वांना, अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात.

महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत

महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत.

या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली.

या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे.

प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य

संघराज्य व्यवस्थेचा आम्ही सन्मानच करतो. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि पार पाडतही आहोत.

मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील माझे तमाम बंधू आणि भगिनी हे ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देणारे सगळे प्रयत्न हाणून पाडतील.

माझे सर्वांना,अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

KGF Chapter 2 Box Office Collection Day 15 : ‘KGF 2’ हिंदी 400 कोटींचा टप्पा ओलांडणार, आता ‘दंगल’ टार्गेटवर

केजीएफ चेप्टर 2 (KGF Chapter 2)

KGF Chapter 2 Box Office Collection Day 15 । अभिनेता यश, श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ रिलीजच्या १५ व्या दिवशी आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाच्या घरगुती बॉक्स ऑफिसच्या आकड्यांच्या खूप जवळ आला आहे.

चित्रपटाचे निर्माते आणि वितरकांना विश्वास आहे की हा चित्रपट लवकरच 400 कोटींचा टप्पा गाठेल. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच हिंदी चित्रपटांच्या यादीतून सलमान खानचा ‘टायगर जिंदा’ मागे पदला आहे.

आता ‘दंगल’ टार्गेटवर

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण केले आहेत. या 15 दिवसांत, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर त्याच्या सर्व भाषिक आवृत्त्यांसह सुमारे 682 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे कलेक्शनही गुरुवारी 350 कोटींवर पोहोचले. ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट आतापर्यंत हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या 10 सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडला आणि नंतर ईदच्या दिवशी चांगला व्यवसाय केला तर हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातच आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचे स्थान बळकावेल.

15 व्या दिवसाची कमाई

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने दुसऱ्या गुरुवारी बॉक्स ऑफिसवर 9.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार. यामध्ये चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने जवळपास 5.40 कोटींची कमाई केली आहे.

याशिवाय या चित्रपटाने कन्नडमध्ये सुमारे 2 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 1 कोटी रुपये, तामिळमध्ये 1.40 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 50 लाख रुपये कमावले आहेत.

वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुन्हा तेजी येईल, अशा शक्यता चित्रपट बाजारात व्यक्त केल्या जात आहेत.

सिक्रेट सुपरस्टारची सुट्टी

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने जगभरात 931.70 कोटींची कमाई केल्यामुळे, चित्रपटाने आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ जगभरातील सर्वाधिक कमाई करणार्‍या पाच भारतीय चित्रपटांच्या यादीतून मागे टाकला आहे.

जगभरातील कमाईत ‘KGF Chapter 2’ या चित्रपटापेक्षा आता फक्त तीन चित्रपट आहेत. पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट आहे ज्याने जगभरात 2070.30 कोटींची कमाई केली आहे.

त्यानंतर क्रमांक लागतो ‘बाहुबली 2’चा ज्याने 1788.06 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकावर नुकताच प्रदर्शित झालेला ‘RRR’ चित्रपट आहे, ज्याची जगभरातील कमाई आतापर्यंत 1103 कोटी रुपये झाली आहे.

हिंदीमध्ये कमाईच्या बाबतीत टॉप 10 चित्रपटांची यादी

रँक चित्रपटाची निव्वळ कमाई – कोटींमध्ये रु । देशांतर्गत बॉक्स ऑफिस

1. बाहुबली – 2510.99
2. दंगल – 387.38
3. KGF चॅप्टर 2 – 349.10
4. संजू – 342.53
5. पीके – 340.80
6. टायगर जिंदा है – 339.16
7. बजरंगी भाईजान – 320.34
8. युद्ध – 317.91
9. पद्मावत – 302.15
10. सुलतान – 300.45

अमरावतीच्या प्रियंकाची आत्महत्या नव्हे तर हत्या; डॉ. पती निघाला खुनी, मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार

Amravati's Priyanka not murdered but murdered; Dr. Husband leaves murderer, girl's father lodges complaint with police

अमरावती : 20 एप्रिल रोजी प्रियंका पंकज दिवाण यांचा त्यांच्या राहत्या घरात साई मल्टी स्पेशलिटी रुग्णालय (Sai Multi Specialty Hospital) राधानगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.

आपली मुलगी प्रियंका हिचा तिचा पती डॉ. पंकज दिवाण, त्याची आई शोभा दिवाण व नणंद स्मिता कांबळे हे सतत मानसिक त्रास द्यायचे. यामुळे प्रियांका हिची आत्महत्या नसून खून असावा, असा संशय प्रियंका हिच्या आई वडिलांना आला.

डॉ. पंकज दिवाण (Doctor Pankaj Diwan) हा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) नोकरीवर होता. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रियंका हिचे पोस्टमोर्टम करण्यात यावे, अशी मागणी प्रियंकाच्या वडील रमेश कातकिडे यांनी केली होती.

श्वास गुदमरून मृत्यू

काल रात्री अकोला येथून प्रियंका हिचा पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाला. यात प्रियंकाची आत्महत्या नसून तिच्या डोक्यावर आतमध्ये गंभीर इजा व श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यावरून गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टर पंकज दिवाण, त्याची आई शोभा दिवाण व बहीण स्मिता कांबळे यांच्या विरोधात खुनाचा व शारीरिक मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे तीनही आरोपी सध्या फरार आहेत. मात्र एका वैद्यकीय व्यवसायात असलेल्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून, पुरावा नष्ट करून आत्महत्या केल्याचा देखावा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

आरोपी डॉक्टर पसार

प्रियंकाची हत्या झाली असावी, अशी शंका तिच्या वडिलांना आली. कारण तिचा पती तिला त्रात देत असल्याची कल्पना त्यांना होती. त्यामुळं प्रियकाच्या पोस्ट मार्टमची मागणी त्यांनी केली.

पीएम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलंय. शिवाय तिचा श्वास गुदमरून मृत्यू झालाय. त्यामुळं आता पती असलेल्या डॉक्टरला बेळ्या पडणार आहेत. तत्पूर्वी तो आता फरार झाला आहे. पण, पोलीस त्याला लवकरच अटक करतील.

 

 

Nanded Crime News : धुळ्यापाठोपाठ आज नांदेडमध्येही 25 तलवारी जप्त; इतक्या तलवारी कुठून आणि कशासाठी येतायत?

Nanded Crime, Crime News, Nanded

नांदेड : धुळ्यात काल पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर आज नांदेडमध्येही पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे.

कारमधून जाणाऱ्या 25 तलवारी नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिवाजीनगर गुन्हे अन्वेषण पथकाने या तलवारी जप्त केल्या आहेत. ही तलवार अमृतसरहून रेल्वेने आल्याचे कळते.

गोकुळनगर परिसरात वाहन पडल्याची माहितीही पोलिसांनी दिली. ही तलवार विक्रीसाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

काल धुळ्यात पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केल्यानंतर महाराष्ट्र हादरला. मात्र, आज दुसऱ्या दिवशीही अशीच घटना नांदेडमध्ये घडली. नांदेड पोलिसांनी या तलवारींच्या उद्देशाचा शोध सुरू केला आहे.

राज्यात एवढ्या तलवारी कशासाठी?

आतापर्यंत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये पुणे, धुळे, नांदेड अशा विविध ठिकाणांहून तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे.

राज्याच्या राजकारणात तणाव वाढला असताना एवढ्या तलवारी राज्यावर का येत आहेत. मोठा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? गुंडांना धमकवण्यासाठी या तलवारी मागविल्या जात आहेत.

पोलीस सध्या तपास करत आहेत. मात्र, दररोज तलवारी जप्त होत असल्याने आता ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

आतापर्यंत आलेल्या बहुतांश तलवारी पंजाबमधून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तलवारींचे पंजाब कनेक्शनही सापडण्याची शक्यता आहे. त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

अनेकदा तलवारी रस्त्यावर नाचवल्या

राज्यात आणि शहरात दहशत पसरवण्यासाठी गुंडांकडून अनेकदा तलवारींचा वापर केला जातो. पुण्यातही अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत.

पोलिसांनी वेळोवेळी या तलवारबाजांवर कारवाईही केली आहे. तरीही बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या तलवारी थांबत नाहीत. त्यामुळे हे प्रकार रोखायचे कसे, असा पेच आता राज्यातील पोलीस यंत्रणेसमोर आहे.

राज्यात अशाच तलवारी येत राहिल्या तर त्यातून राज्यात आणखी हिंसाचार होण्यास मदत होईल. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस तातडीने पावले उचलत आहेत.

पोलीस तपासानंतरच ही तलवार आणण्यामागचा हेतू स्पष्ट होईल. मात्र सध्या हे प्रकार धडकी भरवणारे आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ औरंगाबादेत धडाडणार, औरंगाबाद पोलिसांची सभेला अखेर परवानगी

Raj Thackeray: Raj Thackeray's cannon will be fired in Aurangabad, Aurangabad police meeting finally allowed

औरंगाबाद : औरंगाबाद पोलिसांनी अखेर सभेला परवानगी दिल्याने आता राज ठाकरेंची तोफ औरंगाबाद शहरात (Aurangabad Mns) धडाडणार हे निश्चित झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या बैठकीची चर्चा सुरू आहे. या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ही विचार करत होते.

मात्र, पोलिस आणि सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक बैठका झाल्या आहेत. त्यानंतर पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये अनेक बैठका झाल्या.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही औरंगाबादला भेट देऊन मैदानाची पाहणी केली होती. आणि औरंगाबाद पोलिसांनीही सुरक्षेच्या कारणास्तव मैदानाची पाहणी केली होती. या सर्व मोठ्या घडामोडीनंतर अखेर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली आहे.

बैठकीसाठी काही अटी असतील

  1. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी सभेला काही अटी घातल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेणे बंधनकारक असेल. वांशिक अपशब्द आणि प्रक्षोभक भाषणे होऊ नयेत, असेही पोलिसांनी सांगितले. राज ठाकरेंच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आरोप करत अनेक संघटनांनी या सभेला विरोध केला होता.
  2. सभेच्या वेळेत कोणताही बदल करू नये, असेही पोलिसांनी सांगितले.
  3. सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि कोणतीही दंगलखोर किंवा प्रक्षोभक घोषणा देऊ नये.
  4. सभेसाठी येणारी वाहने वळवली जाणार नाहीत, त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवणार नाही. तसेच कोणतेही रॅली काढण्यात येणार नाही.
  5. या सभेबाबत नागरिकांना जागरूक करण्याची जबाबदारी आयोजकांची असेल, असे सांगण्यात आले आहे.
  6. आयोजकांना सभेसाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यास सांगितले आहे, तसेच येणार्‍या लोकांची संख्या आणि वाहनांची संख्या याची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले आहे.
  7. या मैदानात बसण्याची मर्यादा पंधरा हजार असल्याने यापेक्षा जास्त लोकांना बोलावू नये.
  8. पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणी भक्कम बॅरिकेड्स उभारावेत.
  9. सभेदरम्यान वंश, जात, धर्म, भाषा, जात, जन्माचा प्रदेश, धर्म या आधारावर कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करू नये.
  10. या सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.