अमरावतीच्या प्रियंकाची आत्महत्या नव्हे तर हत्या; डॉ. पती निघाला खुनी, मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार

107
Amravati's Priyanka not murdered but murdered; Dr. Husband leaves murderer, girl's father lodges complaint with police

अमरावती : 20 एप्रिल रोजी प्रियंका पंकज दिवाण यांचा त्यांच्या राहत्या घरात साई मल्टी स्पेशलिटी रुग्णालय (Sai Multi Specialty Hospital) राधानगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.

आपली मुलगी प्रियंका हिचा तिचा पती डॉ. पंकज दिवाण, त्याची आई शोभा दिवाण व नणंद स्मिता कांबळे हे सतत मानसिक त्रास द्यायचे. यामुळे प्रियांका हिची आत्महत्या नसून खून असावा, असा संशय प्रियंका हिच्या आई वडिलांना आला.

डॉ. पंकज दिवाण (Doctor Pankaj Diwan) हा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) नोकरीवर होता. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रियंका हिचे पोस्टमोर्टम करण्यात यावे, अशी मागणी प्रियंकाच्या वडील रमेश कातकिडे यांनी केली होती.

श्वास गुदमरून मृत्यू

काल रात्री अकोला येथून प्रियंका हिचा पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाला. यात प्रियंकाची आत्महत्या नसून तिच्या डोक्यावर आतमध्ये गंभीर इजा व श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यावरून गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टर पंकज दिवाण, त्याची आई शोभा दिवाण व बहीण स्मिता कांबळे यांच्या विरोधात खुनाचा व शारीरिक मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे तीनही आरोपी सध्या फरार आहेत. मात्र एका वैद्यकीय व्यवसायात असलेल्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून, पुरावा नष्ट करून आत्महत्या केल्याचा देखावा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

आरोपी डॉक्टर पसार

प्रियंकाची हत्या झाली असावी, अशी शंका तिच्या वडिलांना आली. कारण तिचा पती तिला त्रात देत असल्याची कल्पना त्यांना होती. त्यामुळं प्रियकाच्या पोस्ट मार्टमची मागणी त्यांनी केली.

पीएम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलंय. शिवाय तिचा श्वास गुदमरून मृत्यू झालाय. त्यामुळं आता पती असलेल्या डॉक्टरला बेळ्या पडणार आहेत. तत्पूर्वी तो आता फरार झाला आहे. पण, पोलीस त्याला लवकरच अटक करतील.