Home Blog Page 315

तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द, आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार

Aurangabad bench repeals piece ban rules, now 1-2 guntas of land can be traded

औरंगाबाद : आता एक बातमी तुमच्या कामाची आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे. तीन गुंठ्यांची अट त्यामुळे असणार नाही.

कारण तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत.

राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलेत. त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याच्या मार्ग मोकळा झालाय.

राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती.

जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता.

त्यामुळं अशा घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजानं बॉण्ड पेपरवर व्हायला लागली होती. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती, त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. त्यामुळं आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.

जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करुन त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याचे रजिस्ट्री होत नव्हती. जमिनीचे ले आऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती, अथवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत होते.

LIC IPO साठी अर्ज करू इच्छिता? थेट किराणा दुकानात जाऊन अर्ज करा !

Want to apply for LIC IPO? Apply directly at the grocery store!

LIC IPO मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुमच्या जवळच्या किराणा दुकानात जाऊन अर्ज करा, हे याचे सोपे उत्तर आहे.

होय, मित्रांनो, तुम्ही किराणा दुकानातूनही LIC IPO मध्ये नवीन सुविधेसह गुंतवणूक करू शकाल. Paytm ब्रँड अंतर्गत अग्रणी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी One-97 ने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पेटीएम मनी, एलआयसी आयपीओ किरकोळ स्टोअरमध्ये नेण्यासाठी तयार आहे. कंपनीने देशभरातील किराणा दुकानांमध्ये QR कोड सादर केले आहेत.

या QR कोडचा वापर करून कोणीही त्यांचे डीमॅट खाते सहज उघडू शकते. शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी डीमॅट खाते अनिवार्य आहे. हे खाते उघडून लोक LIC IPO साठी बोली लावू शकतील.

मोफत डिमॅटची लाट येईल

LIC आयपीओसाठी भागीदार दुकानांमध्ये पेटीएम क्यूआर कोड सादर करेल. यामुळे गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करणे सोपे होईल.

हा उपक्रम लोकांना मोफत डिमॅट खाती उघडण्यास सक्षम करेल आणि देशात मोफत डिमॅट खात्यांची लाट निर्माण करेल. UPI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतच्या बोलींना परवानगी देणारा Paytm मनी देशातील पहिला डिस्काउंट ब्रोकर ठरला आहे.

किरकोळ गुंतवणूकदार श्रेणी व्यतिरिक्त, कंपनीने पॉलिसीधारकांसाठी एक स्वतंत्र श्रेणी तयार केली आहे जे एलआयसी IPO साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

पेटीएम मनीच्या माध्यमातून असा करा एलआयसी आयपीओसाठी अर्ज

  1. पेटीएम मनीच्या होम स्क्रीनवरील आयपीओ विभागावर जा.
  2. प्राधान्यानुसार गुंतवणूकदाराचा प्रकार निवडा. 5 लाख रुपयांहून अधिक बोली लावण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती एचएनआय प्रवर्गाचा पर्याय निवडून हे करू शकतात.
  3. जर तुम्ही विमाधारक असाल तर आयपीओ डिटेल्स या पेजवर ‘इन्व्हेस्टर टाइप’ खाली जाऊन पॉलिसी होल्डर्स निवडा. याशिवाय तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
  4. आयपीओमधील ‘करंट अँड अपकमिंग’ टॅबमध्ये एलआयसी आयपीओ हा पर्याय उपलब्ध असेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘ॲप्लाय नाऊ’ हे बटन दिसेल, ते बटन तुम्हाला बिड पेजकडे घेऊन जाईल. या पेजवर तुम्ही दर अद्ययावत करू शकता किंवा तुमच्या अर्जावरील संख्या नोंदवू शकता. ॲड यूपीआय डिटेल्स’ विभागात तुमचा यूपीआय आयडी अद्ययावत करा आणि ‘ॲप्लाय’वर क्लिक करा.

Indian Railway Job : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा न घेता थेट भरती

Railway Recruitment 2022

Indian Railway Job : दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने वेल्डर, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (हिंदी, इंग्रजी), मशीनिस्ट यासह विविध ट्रेडमधील शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

या भरती मोहिमेद्वारे विविध ट्रेडमध्ये एकूण 1033 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया 25 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 24 मे किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

SECR रेल्वे शिकाऊ भरती 2022 मध्ये DRM कार्यालय, रायपूर विभागातील 696 शिकाऊ पदे आणि वॅगन रिपेअर शॉप, रायपूरमधील 337 शिकाऊ पदांचा समावेश आहे.

खाली दिलेल्या सूचनेमध्ये योग्यतेनुसार रिक्त जागा तपशील तपासू शकता. अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी सरकारी नियमांनुसार उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल, अधिक माहितीसाठी अधिसूचना पहा.

रेल्वे प्रशिक्षणार्थी पदासाठी उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. उमेदवारांची निवड केवळ मॅट्रिक (एक्स) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या किंवा टक्केवारीच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवार Apprenticeshipindia.org या Apprenticeship India च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्जाची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही. उमेदवार फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राज ठाकरेंच्या सभेचे पुरावे गोळा, औरंगाबाद पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

Gather evidence of Raj Thackeray's meeting, all eyes on Aurangabad police action

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस तपासाला गती मिळाली आहे. बैठकीत केलेल्या वक्तव्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. लवकरच साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील 1 मे च्या सभेच्या संदर्भात आरोप करण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी आपल्या भाषणाने लोकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिटी चौकाचे पोलिस निरीक्षक गिरी यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सभेच्या ठिकाणाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी सभेतील भाषणाचे पुरावे गोळा केले आहेत. उद्या, शुक्रवारी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

राज ठाकरे यांना तत्काळ नोटीस बजावायची की नंतर, हे तपास अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे, असे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सगळेच प्रमुख नेते हे आंदोलनाच्या दिवशी नॉट रिचेबल होते. त्यांच्यावरून मोठी टीका होत होत.

या सर्व प्रकारावर आता साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचा प्रचंड दबावामुळे आम्ही बाहेर पडू शकलो नसल्याचं ते म्हणाले.

तसंच वसंत मोरे हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे तिरुपती बालाजी येथे गेले होते. त्याची पूर्वकल्पना ही त्यांनी या आधीच दिली होती. मनसेच्या आंदोलनाचा परिणाम दिसून येतो आहे. पहाटेची अजान आता भोंग्यावर होत नसल्याचे दिसून येत आहे.

तर दुपारच्या अजानसाठी ठरवून दिलेल्या डेसीबलमध्ये आवाजाची मर्यादा असल्याचे देखील दिसून आले आहे.. त्यामुळे मनसेने जे काही आंदोलन छेडलं होतं यशस्वी झाले आहे, असा दावा बाबर यांनी केला.

Citizenship Amendment Act : कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार : गृहमंत्री अमित शहा

Union Home Minister Amit Shah

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) अंमलबजावणी बाबत मोठे विधान केले. अमित शहा सध्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल (West Bengal) दौऱ्यावर आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act) हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागसह देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. हा कायदा नागरिकांच्या विरोधामुळे अनेक काळांपासून फाईलींमध्ये बंद करुन ठेवल्याचे बोलले जात होते.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यातील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अमित शहा म्हणाले की, तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे, की नागरिकत्व कायदा (Citizenship Amendment Act) कधीही येणार नाही.

पण मी त्यांना सांगू इच्छितो की कोरोना महामारी संपल्यावर आम्ही सीएए कायदा (CAA) लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण सीएए कायदा हे वास्तव आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.

शहा म्हणाले, मी आज उत्तर बंगालमध्ये आलो आहे, मला सांगायचे आहे की कोरोना महामारी संपताच आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू (Citizenship Amendment Act) करू.

यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ही त्यांची योजना आहे, ते संसदेत विधेयक का आणत नाहीत ? मी आपणास सांगते की ते 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येणार नाहीत.

कोणाचाही नागरिकत्वचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आमची एकता हीच आमची ताकद आहे. वर्षभरानंतर ते इथे आले आहेत. ते प्रत्येक वेळी येतात आणि अशा फालतू गोष्टी बोलतात.”

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात २०१९ सालाच्या शेवटी २०२० च्या सुरुवातीच्या काळात देशभरात मोठी निदर्शने करण्यात आली होती. या कायद्यास नागरिकांचा विरोध पाहता त्यावेळी हा कायदा केंद्रसरकारने तातडीने लागू केला नाही. आता गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल.

भीमा-कोरेगाव हिंसाचार : आयोगाच्‍या १० प्रश्‍नांवर शरद पवारांनी दिलेली उत्तरे

Bhima-Koregaon Violence: Answers given by Sharad Pawar on 10 questions of the Commission

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी दाखल झाले होते. सह्याद्री अतिथीगृहात निवृत्त न्‍यायमूर्ती जे. एन. पटेल आणि आयोगाचे सदस्‍य सुमित मलिक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शरद पवार यांची साक्ष नोंदवण्‍यात आली.

प्रश्न  : एखाद्या वक्तव्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं, तेव्हा त्याची जबाबदारी कुणाची असते?

शरद पवार : लोकप्रतिनिधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रक्षोभक वक्तव्य असता कामा नये, जेणेकरून समाजातील विविध स्तरांत त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी संबंधित लाेकप्रतिनिधीवरच येते.

प्रश्न  : कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी जागा देताना काय गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात?

शरद पवार : अशा सभांना जागा देताना त्यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून सभेनंतर तिथं कोणतीही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.

प्रश्न  : मात्र सोयीस्कर ठिकाणीही अशा घटना घडू शकतात? मुंबईत आझाद मैदान, दिल्लीतील शेतकरी आंदोलन इथं हेच दिसून आलंय?,

शरद पवार : सामान्यत: अशी आंदोलन सत्तेजवळ जाऊन घेण्याचाच लोकांचा प्रयत्न असतो. जेणेकरून शक्य झाल्यास संबंधित मंत्री किंवा सरकारचे प्रतिनिधी तिथं जाऊन आंदोलकांची भेट घेऊ शकतील, आंदोलनाची दखल घेऊ शकतील.

प्रश्न : तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतूदींच्या आधारे आहे?

शरद पवार : आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं हे आपलं कर्तव्य आहे. माझ्या माहितीनं सरकाला काही मदत मिळणार असेल तर ते जरूरीचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं आयपीसी कलम १२४ (अ) हे ब्रिटीशकालीन आहे. मात्र हल्ली त्याचा वापर सर्रासपणे चुकीच्या पद्धतीनं होताना दिसतोय. तो थांबायला हवा असं मला वाटते.

प्रश्न  : मात्र ही गोष्ट तुम्ही एक राज्यसभा सदस्य या नात्यानं संसदेतही मांडू शकता; मग तिथं हे का मांडत नाही?

शरद पवार : होय, बरोबर आहे. मला वाटतं जेव्हा मला योग्यवेळ वाटेल तेव्हा मी तिथंही या गोष्टी मांडेन.

प्रश्न : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती पोलीस गोळा करत असतात, मात्र त्यांनी त्यावर तातडीनं कारवाई करत गुन्हा दाखल करावा की वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहावी?

शरद पवार : पोलीस नियमावलीनुसार पोलिसांना काही अधिकार दिलेले आहेत, त्यांनी आदेशांची वाट न पाहाता त्यानुसार कारवाई करायला हवी.

प्रश्न :  परंतु बऱ्याचदा पोलीसांना तसं करता येत नाही, 92 च्या दंगलीदरम्यान हे दिसून आलंय; मग अशावेळी पोलिसांनी काय करावं, त्यांनी वाढीव अधिकार द्यावेत असं तुम्हाला वाटतं का? तुमच्यासारखी जेष्ठ आणि अनुभवी व्यक्ती आमच्यासमोर बसलीय, म्हणून तुमच्या अनुभवाचा जास्तीत जास्त वापर करावा हाच आमचा हेतू आहे.

शरद पवार : पोलिसांनी त्यांना नियमावलीनुसार दिलेल्या अधिकारांत तातडीनं कारवाई करणं अपेक्षित आहे.

प्रश्न: दंगलीत सार्वजनिक मालमत्तेचं जे नुकसान होतं त्याला जबाबदारी कोणाला धरावं?, तर अशा सभांमध्ये असामाजिक तत्व दाखल होऊ नयेत?, ही आयोजकांची जबाबदारी नाही का?,

शरद पवार : कायदा-सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी पोलिसांचीच आहे. असामाजिक तत्त्वांना रोखणं त्यांना प्रतिबंध करणं ही त्यांचीच जबाबदारी आहे.

प्रश्न : प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद उमटले, मालमत्तेचं बरंच नुकसान झालं?, त्याची जबाबदारी कुणाची?

शरद पवार : मी इथं केवळ कोरेगाव भीमाच्या घटनेबाबत बोलायला आलो आहे. त्यानंतर कुणी काय भुमिका घेतली?, त्यानं पुढे काय झालं?, यावर मी बोलू इच्छित नाही.

प्रश्न : आयोगानं अनेक राजकीय नेत्यांना बोलावलं होतं, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनाही बोलवायला हवं का?

शरद पवार : हा आयोगाचा प्रश्न आहे. त्यांनी ठरवावं कुणाचा जबाब नोंदवायचाय, कुणाचा नाही.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही, पंतप्रधानांनी लक्ष घालून ओबीसींचा प्रश्न सोडवावा : मंत्री छगन भुजबळांची मागणी

No election without OBC reservation, PM should focus on OBCs: Minister Chhagan Bhujbal

मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होणार नाहीत, असे मत महाविकास आघाडीचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात निर्माण झाला आहे.

देशातील ओबीसी भरडला जाऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने

काल, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात निवडणूक आयोगाला 10 मार्चपर्यंत प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले, परंतु निवडणूक आयोगाची प्रभाग रचना अद्याप निश्चित झालेली नाही आणि राज्य सरकारचा प्रभाग रचनेचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला नाही.

त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल. मात्र, राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ठाम असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मध्य प्रदेशची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मध्य प्रदेशने केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत आहेत. या खटल्याच्या निकालावर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले.

निवडणुका घेणे अवघड आहे

ते म्हणाले की, राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत अध्यादेश काढला होता. या अध्यादेशानुसार प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारच्या ताब्यात आले.

या अध्यादेशाविरोधात भाजपचे राहुल वाघ न्यायालयात गेले, मात्र न्यायालयाने प्रभाग रचनेचा कायदा रद्द केला नाही. राज्य सरकारने नगरसेवकांच्या संख्येतही बदल करून कायदा केला आहे, त्यामुळे आता निवडणुका घेणे अवघड झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मागासवर्ग आयोगाची भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज समर्पित मागासवर्ग आयोगाची भेट घेतली.

लोकसभेने आरक्षण मंजूर केले

यावेळी लोकसभेने मंडल आयोगाने 54 टक्के समाजाला दिलेल्या 27 टक्के आरक्षणाला मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले आहे.

तथापि, तिहेरी चाचण्यांपैकी दोन चाचण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत परंतु तिसरी चाचणी इम्पिरिकल डाटा शिवाय पूर्ण होणार नाही.

मध्य प्रदेश राज्याने निवडणूक आयोगाकडे उपलब्ध डेटाचा वापर केला आहे. तसा वापर करता येईल का, याचा विचार करण्याची विनंती आम्ही आयोगाला केली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

इम्पीरियल डेटा लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी करताना मंत्री छगन भुजबळ यांनी यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

KGF Chapter 2 Box Office Collection Day 22 : KGF हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

केजीएफ चेप्टर 2 (KGF Chapter 2)

KGF Chapter 2 Box Office Collection Day 22 : KGF Chapter 2 हा चित्रपट आपल्या दमदार कमाईमुळे सतत चर्चेत असतो. देशातूनच नाही तर परदेशातूनही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

यशची स्टाइल आणि अॅक्शन पाहण्याची लोकांमध्ये क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 22 दिवस झाले आहेत आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये रॉकीची जादू कायम आहे.

मीडिया रिपोर्टनुसार KGF 2 हा आतापर्यंत हिंदीमध्‍ये सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत आला आहे. KGF 2 ला दुसरे स्थान मिळाले आहे.

भारतातील कलेक्शन

1 ला दिवस – 116 कोटी रु
2 रा दिवस – 90 कोटी रु
3 रा दिवस – 81 कोटी रु
4 था दिवस – रु. 91.7 कोटी
5 वा दिवस – रु 25.57 कोटी
6 वा दिवस – 19.52 कोटी रु
7 वा दिवस – रु. 33.00 कोटी
8 वा दिवस – 13.58 कोटी रुपये
9 वा दिवस – रु 23.35 कोटी
10 वा दिवस – रु. 36.45 कोटी
11 वा दिवस – रु 45.35 कोटी
12 वा दिवस – रु. 17.1 कोटी
13 दिवस – 14.9 कोटी रुपये
14 वा दिवस – 13.81 कोटी रुपये
15 वा दिवस – 9.78 कोटी रु
16 वा दिवस – रु. 9.5 कोटी
17 वा दिवस – रु. 16.8 कोटी
18 वा दिवस – 21.2 कोटी रु
19 वा दिवस – 7.5 कोटी
20 वा दिवस – – रु. 13.57 कोटी
20 वा दिवस – 10 कोटी रुपये

KGF चमकदार कामगिरी करत आहे. दुसरीकडे, 22 व्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर अंदाजानुसार चित्रपटाने 8 ते 9 कोटींचा व्यवसाय केला आहे, तर जगभरात चित्रपटाने 1110 कोटींचा आकडा पार केला आहे.

रवीना टंडन आणि संजय दत्त यशसोबत केजीएफमध्ये दिसले आहेत. सर्व कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

त्याचबरोबर हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा या चित्रपटाबाबत व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहेत की केजीएफचा तिसरा भाग देखील लवकरच बनवला जाऊ शकतो.

New Tata Harrier Petrol : लवकरच येत आहे टाटा हॅरियर पेट्रोल, अलिशान कारविषयी जाणून घ्या !

New Tata Harrier Petrol: Coming Soon Learn about Tata Harrier Petrol

New Tata Harrier Petrol : टाटा मोटर्सची एसयूव्ही सध्या भारतात चर्चेत आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर (Tata Harrier) लाखो लोकांची पसंती आहे.

आता चांगली बातमी अशी आहे की टाटा हॅरियरला लवकरच फेसलिफ्ट लूक मिळेल. यात पेट्रोल इंजिनसोबतच अनेक नवीन फिचर्स असतील.

हॅरियरच्या पेट्रोल व्हेरिएंटची लोक अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता बातमी येत आहे की यावर्षी हॅरियर (Tata Harrier) पेट्रोल मॉडेल सुरू होणार आहे. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी फायदेशीर ठरू शकते.

तुम्हाला कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर आम्हाला त्याबद्दल अधिक माहिती हवी आहे. त्याचप्रमाणे कार ही महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे.

ती घेण्यापूर्वी, तुम्हाला त्याची वैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला टाटा हॅरियरबद्दल सर्व काही सांगणार आहोत.

Tata Harrier मध्ये अनेक कॉस्मेटिक बदल

टाटा हॅरियर फेसलिफ्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. SUV मध्ये नवीन ग्रिल आणि हेडलॅम्प तसेच नवीन बंपरसह अनेक कॉस्मेटिक बदल असू शकतात. आगामी हॅरियर फेसलिफ्टमध्ये नवीन अलॉय व्हील्ससह बरेच काही दिसण्याची अपेक्षा आहे.

Tata Harrier ची वैशिष्ट्ये आणि इंजिन-शक्ती

भारतातील टाटा हॅरियर (Tata Harrier) फेसलिफ्ट प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम (ADAS), 360-डिग्री कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स, सभोवतालची प्रकाश व्यवस्था, सुधारित इन्फोटेनमेंट सिस्टमसह अनेक नवीन वैशिष्ट्यांसह ऑफर केली जाऊ शकते.

यासारख्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच वेळी, जर आपण Tata Harrier Facelift च्या संभाव्य इंजिन आणि पॉवरबद्दल बोललो तर त्यात एक नवीन पेट्रोल इंजिन दिसू शकते.

जे 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल आणि 150bhp पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Harrier पेट्रोल ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह दिले जाऊ शकते. टाटा हॅरियर पेट्रोल लॉन्च संदर्भात अधिक तपशील येत्या काही दिवसांत उघड केले जातील.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, हायकोर्टात याचिका

Raj Thackeray: Petition case filed against Raj Thackeray, petition in High Court

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध मशिदींसमोर हनुमान चालीसा करून आणि मशिदींवरील लाऊड स्पीकरबाबत प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्याविरुद्ध कलम १५३ (दंगलखोर भाषण भडकावणे), कलम ११६ (गुन्हा भडकावणे) आणि ११७ (१० हून अधिक व्यक्तींनी केलेले गुन्हे) भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, ठाकरे यांच्या हनुमान चालिसाच्या पठणामुळे समाजातील सर्व स्तरातील शांतता भंग पावली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणारी प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा, राजकीय दौरे आणि राज्यातील विविध शहरांच्या दौऱ्यांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

या शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला.

तसेच औरंगाबाद येथील भाषणात मनसे कार्यकर्त्यांना ४ मे पर्यंत मशिदीतील लाऊड स्पीकर हटवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे आदेश दिले होते.

त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे.

त्यासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत, त्यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी यातून करण्यात आली आहेत.

RECENT POSTS