MNS President Raj Thackeray । मनसेच्या ‘भोंग्या’ला शांततापूर्ण प्रतिसाद, इस्लाम धर्मियांनी यावेळी घेतली शांततेची भूमिका

59
MNS President Raj Thackeray. Peaceful response to MNS's 'Bhongya', Islamists took the role of peace this time

मुंबई, 4 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता.

आज काही ठिकाणी मनसेच्या सैनिकांनी पोलिसांकडे दुर्लक्ष करत मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईतील अनेक मशिदींमध्ये भोंगे न वाजवता शांततेने अजान पठण करून उत्तर देण्यात आले.

मनसेने आज 4 तारखेची डेडलाईन दिल्याने राज्यात तणावाचे वातावरण आहे. मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काल रात्रीपासून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्यामुळे आज सकाळपासून पुन्हा अटकसत्र सुरू झाले. मात्र, मुंबईतील अनेक मशिदींमध्ये आज शांततेचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील अनेक मशिदींमध्ये कर्णकर्कश आवाज न करता अजान पठण करण्यात आले. इस्लाम धर्मियांनी यावेळी शांततापूर्ण भूमिका घेतली आहे.

आजही अनेक मशिदींनी वाद चिघळवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाचे आदेश पालन करून शांतता राखण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनसेने निर्माण केलेल्या वादावर सध्या तरी पडदा पडला आहे.

तसेच, मुंबई पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका महिन्यात मुंबईतील 1,144 मशिदींनी अर्ज केले आहेत. भोंग्याच्या संदर्भात या मशिदींनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 803 मशिदींना परवानगी देण्यात आली आहे.

सर्व मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, 4 मे रोजी राज्यातील काही मशिदींमध्ये भोंग्याचा वापर करण्यात आला नव्हता, परंतु आवाजाची पातळी कमी असल्याचे राज्य पोलिस सूत्रांनी सांगितले.

परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, शिर्डी, श्रीरामपूर आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी मशिदींवर लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला नाही.