मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले होते.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निवडणुका नको, अशी भाजपची भूमिका आहे. हीच मागणी करण्यासाठी ते भेटीला गेले होते.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. यावेळी अंतिम निर्णय येण्याची देखील दाट शक्यता आहे. दरम्यान आयुक्त काय म्हणतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील जिल्हापरिषद, पंयाचत समिती, महानगर पालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. प्रभाग रचना, गट रचना झाली आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेक राजकिय पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.