बेळगाव: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत नवी दिल्लीत बैठक घेतली.
पण, बैठक होऊन 24 तास उलटत नाही तोच बेळगावात कर्नाटक सरकारची गाडी अज्ञातांनी फोडली. ही घटना तणाव निर्माण व्हावे म्हणून केल्याचे लक्षण आहे.
बेळगावात आज दुपारी कर्नाटक सरकारच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. काही अज्ञात तरुणांनी कर्नाटक सरकारच्या गाडीची तोडफोड केली. ही गाडी अधिवेशनाच्या कामासाठी आली होती.
हलगाजवळ 5 अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक केली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेक करून पाच तरुण फरार झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद अखेर दिल्लीत मिटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही बैठक सकारात्मक असल्याचे सांगितले आणि या बैठकीत झालेल्या निर्णयांचीही माहिती दिली.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी 3 मंत्री बसून चर्चा करतील आणि चिंतन करतील. दोन राज्यांमध्ये अनेक छोटे-मोठे मुद्दे आहेत, जे शेजारील राज्यांमध्ये नेहमीच असतात. हे प्रश्न 3-3 मंत्री सोडवतील.
दोन्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत राहील. इतर भाषिकांना, तसेच प्रवासी, व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे दोन्ही राज्यांनी मान्य केले आहे.
एअरटेलचा जबरदस्त प्रीपेड प्लॅन, सिम एका रिचार्जमध्ये वर्षभर चालेल, सोबत अनेक फायदे
घटनेच्या कक्षेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्ये दावा दाखल करणार नसल्याचे अमित शाह म्हणाले.