मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजपमध्ये युती होणार, अशी चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये वारंवार होणाऱ्या बैठका या युतीचे (मनसे भाजप युती) संकेत आहेत.
मात्र या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण मनसेची नुकतीच बैठक झाली. स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
मनसेच्या आजच्या बैठकीत युती आणि आगामी निवडणुकीवर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असली तरी त्याचा फायदा होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे. ते योग्य नाही. लोक गोंधळले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, कामाला लागा, अशा सूचनाही राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
भाजप नेते आणि ठाकरे यांची भेट
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या घरी भाजप नेत्यांची ये-जा वाढली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे देखील काही दिवसांपूर्वी नागपूर दौऱ्यावर आले होते.
त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. या सर्व बैठकांनंतर भाजप-मनसे युतीची चर्चा रंगली होती, मात्र आता या सगळ्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.