आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज । नव्या सरकारचा रविवारी शपथविधी, शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

222
The biggest news right now. The new government was sworn in on Sunday

Maharashtra Political Crisis : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदेनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर पेच निर्माण केला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण भलते रंगले आहे.

आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढल्याने भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, रविवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे कळते. शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एवढेच नाही तर शिंदे गटाला भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे कळते.

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये भाजपने हीच ऑफर एकनाथ शिंदे यांना दिली आहे. शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपदासह 12 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडे मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेपैकी 25 टक्के वाटा अपेक्षित आहे. शिंदे यांच्यासह दहा जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटाला विद्यमान मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांचा पाठिंबा आहे. सर्व सहा मंत्र्यांचा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे एकापाठोपाठ एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जात असताना काँग्रेसच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दरम्यान, सरकार कोसळण्याची वेळ आल्यास मध्यावधी निवडणुका नको, असे काँग्रेसचे आमदार सांगत आहेत.

निवडणुकीची वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसण्याची मागणी काँग्रेस आमदारांनी कमलनाथ यांच्याकडे केली आहे. काँग्रेस आमदारांनी विधानसभा बरखास्त करू नये, अशी मागणी केली आहे.