MLC Election 2022: भाजपाचा पुन्हा महाविकास आघाडीला धक्का; प्रसाद लाड विजयी

MLC Election 2022: BJP pushes Maha Vikas Aghadi again; Prasad Lad wins

MLC Election 2022 | मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आज विधानपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पार पडली. ही निवडणूक राज्यसभेसारखी चुरशीची होती.

पुन्हा मोर्चेबांधणी करून सरकार स्थिर नाही, असा संदेश देण्याची योजना भाजपने आखली होती. या निवडणुकीत पराभूत उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. या निवडणुकीचे निकाल हाती आले आणि भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे एक मत बाजूला काढल्याची माहिती मिळाली. विधान परिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा धक्का दिला आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत. प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले आहेत. राज्यसभेनंतर भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा पराभव केला आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. महाविकास आघाडीसोबतच भाजपनेही विधानभवनासमोरून मिरवणूक काढली आहे.