मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेस नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काँग्रेस मोठा निर्णय घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना महाविकास आघाडीतून माघार घेण्यास तयार आहे, पण आधी मुंबईत येऊन अधिकृत मागणी करा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तुमच्या मागणीचा नक्कीच विचार करू, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) काल बोलले, त्यात ते महाविकासगडी सोडण्याबाबत काहीच बोलले नाहीत, मग 20 तासात अचानक काय झाले? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना पडला आहे.
आता वेळ निघून गेली आहे
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांनी संजय राऊत यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. आता वेळ निघून गेली आहे, गाडी खूप पुढे गेली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.