Latur News : ग्रामपंचायत आर्वी येथे राष्ट्रीय भूमापन दिन उत्साहात साजरा

Latur News: National Survey Day celebrated at Gram Panchayat Arvi

लातूर  : राष्ट्रीय भूमापन दिना निमित्त आर्वी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नुकताच भूमापन दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, उपजिल्हाधिकारी भूसंपादन जीवन देसाई, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले, उपअधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती सिमा देशमुख यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात दिप्रज्वलन व मोजणी साहित्याचे पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय भूमापन दिनाच्या निमित्ताने महासामित्व योजनेतंर्गत ड्रोन सर्व्हेद्वारे करण्यात आलेल्या गावठाण मोजणी मिळकतीचे प्रातिनिधीक स्वरुपात सनद वाटप जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते आर्वी येथील रहिवासी यांना प्रदान करण्यात आले.

तसेच सदर ड्रोन सर्व्हेचे काम उत्कृष्ठ कार्य पार पाडल्याबद्दल भूमि अभिलेखच्या उपअधीक्षक श्रीमती सीमा देशमुख तसेच त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमि अभिलेखच्या उपअधीक्षक श्रीमती सिमा देशमुख यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपजिल्हाधिकारी भूसंपादन जीवन देसाई यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन आर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच धनंजय देशमूख यांनी केले.