Latur News | बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या 5 माऊली बुडाल्या, सर्वत्र हळहळ

Latur News

Latur News | लातूरमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. साठवण तलावात एक मुलगा बुडू लागला. हे पाहून त्या मुलाला वाचवण्यासाठी तलावाशेजारी उभी असलेली एक महिला गेली.

त्यानंतर तलावाच्या किनाऱ्यारील इतरही महिलांनी त्यांची मदत करण्यासाठी पाण्यात प्रवेश केला.

मात्र मुलाला वाचवताना आपलेही प्राण वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न महिलांनी केले. मात्र पाण्याचा प्रवाह आणि तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यानं या पाचही माऊली तलावात बुडाल्या इतर नागरिकांच्या मदतीने मुलाला वाचवण्यात यश आलं.

मात्र या पाचही माऊलींना वाचवता आलं नाही. एकाच वेळी पाच महिलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील उजना गावच्या परिसरातील साठवण तलावात ही घटना घडली. सकाळी 10 वाजताची ही घटना आहे.

विशेष म्हणजे या पाचही महिला ऊसतोड कामगार होत्या. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील त्या रहिवासी आहेत.

कामानिमित्त त्या या भागात आल्या होत्या. मात्र बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात या पाचही महिलांचा करुण मृत्यू झाला.

मृत महिलांची नावं : राधाबाई आडे (वय-45), सुषमा राठोड (वय-21), काजल आडे (वय-19), दिक्षा आडे (वय-22), अरुणा राठोडा (वय-25)

महिला बुडत असल्याचे पाहिल्यानंतर तलावावरील इतरांनी गावकऱ्यांना ही बातमी दिली. त्यानंतर गावकरी त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले.

मात्र या घटनेत फक्त मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. अखेर पाचही महिलांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.