चाकूर : तालुक्यातील हाळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिव्यांग शिक्षिका नंदा इरप्पा नरहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे ‘सेवा सन्मान राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२’ जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
श्रीमती नरहरे यांना 78% शारीरिक अपंगत्व आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
पुरस्कार निवड समितीचे सदस्य दीपक चामे, रंगनाथ सागर, रविराज देशमुख, जयराज सोडले यांनी या कामांची दखल घेतली. निवडीचे पत्र गटशिक्षणाधिकारी संजय आलमले, तालुका केंद्रप्रमुख रविराज देशमुख, जयराज सोडले यांच्या हस्ते देण्यात आले.
रविवारी (१५ मे २०२२) सकाळी ९ वाजता अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, पुणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.