Latur Gram Panchayat Election Result 2022 : लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 153 ग्रामपंचायतींवर भाजपने, तर काँग्रेसने 73 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
ग्रामीण भागातील ग्रामप्रमुखांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून 351 ग्रामपंचायतींपैकी 153 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवला आहे.
काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत 73 ग्रामपंचायती जिंकल्या. तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असून 42 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने 16 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत, तर शिवसेनेच्या शिंदे गटानेही तीन ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मात्र, या निकालामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपच्या वतीने जिल्हाभर जल्लोष करण्यात येत आहे.
मलकापूर : उदगीर तालुक्यातील काँग्रेसचे मोठे नाव असलेल्या मुन्ना पाटील यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार व माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या गटाने भाजप गटासह इतरांनाही यश मिळविले आहे. संजय बनसोडे यांचे मलकापूर हे गाव.
भोकरंबा : लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या पॅनलचा पराभव झाला. सरपंचपदासह पाच जागांवर भाजपप्रणित गटाचा ताबा आहे. अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढण्यात भाजपला यश आले आहे
शिरूर ताजबंद : अहमदपूरमधून राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. विरोधकांना सरपंचपदाच्या केवळ तीन आणि 14 जागांवर विजय मिळवता आला.
किनगाव : अहमदपूर किनगाव येथील मोठी ग्रामपंचायत जिंकून भाजप गटाने काँग्रेसची सत्ता संपवली.
आशिव : औसा विधानसभा मतदारसंघातील आशिव हे गाव शिवसेनेचे दोन टर्म माजी आमदार दिनकर माने यांचे आहे. ते अनेक वर्षे सत्तेत होते. भाजपने येथे सत्ता स्थापन केली आहे. तसेच 15 पैकी 14 जागांवर भाजपची सत्ता आहे.
मुरुड : मुरुड ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराचे पती अमरबापू नाडे यांचा मंचावर बोलत असताना मृत्यू झाला. त्यांच्या पॅनलचा भाजपने बाजी मारली आहे.
अमृता अमर नाडे यांनी 17 पैकी 16 जागांवर तसेच सरपंच पदावर विजय मिळवला आहे. त्यांचा पॅनल मुरुड परिवर्तन पॅनल भाजपप्रणित आहे.
रामेश्वर : भाजपचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांची स्थिती विजयाचा आनंद साजरा करण्यासारखी नाही. गावातील नऊ जागाही त्यांनी काबीज केल्या, मात्र सरपंचपद त्यांना राखता आले नाही.
लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल
- एकूण ग्रामपंचायत- 351
- शिवसेना ( ठाकरे गट ) – 16
- शिवसेना शिंदे गट – 03
- भाजप- 153
- राष्ट्रवादी- 42
- काँग्रेस- 73
- इतर- 58 (यात 16 ग्रामपंचायत बिनविरोध आहेत, ज्या सर्वपक्षीय आहेत )
- एकूण – 348
- तीन ग्रामपंचायतीचं सरपंच पद रिक्त (फॉर्म भरलेच नाही)
उदगीर तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 26
- राष्ट्रवादी – 13
- कॉंग्रेस – 05
- भाजप – 05
- शिवसेना ( शिंदे गट ) – 01
- इतर – 01
औसा तालुका
- एकूण 60 ग्रामपंचायत ( दोन बिनविरोध )
- कॉंग्रेस – 20
- राष्ट्रवादी – 03
- शिवसेना ( ठाकरे ) – 15
- भाजप – 10
- इतर – 10
देवणी तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 08
- कॉंग्रेस – 02
- भाजप – 06
जळकोट तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 12
- राष्ट्रवादी – 01
- कॉंग्रेस – 02
- भाजप – 09
शिरूर अनंतपाळ तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 11
- भाजप – 09
- कॉंग्रेस – 02
निलंगा तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 62
- भाजप – 39
- कॉंग्रेस – 10
- राष्ट्रवादी – 01
- शिवसेना शिंदे गट – 06
- इतर – 06
अहमदपूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 42
- भाजप – 23
- राष्ट्रवादी – 18
- इतर – 01
रेणापूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 33
- भाजप – 20
- काँग्रेस – 12
- शिवसेना ( शिंदे गट ) – 01
लातूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 44
- काँग्रेस – 18
- भाजप – 13
- इतर – 13
चाकूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत – 46
- भाजप – 19
- राष्ट्रवादी – 06
- काँग्रेस – 02
- शिवसेना ( ठाकरे गट ) – 01
- शिवसेना ( शिंदे गट ) – 01
- इतर – 17