युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तावेज आहे. मुलाच्या शाळेत प्रवेशापासून ते सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मागणी केली जात आहे.
आधार कार्डप्रमाणेच पॅनकार्ड हेही एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. पैशाच्या व्यवहारासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी हे आवश्यक आहे.
अनेकदा घाई गडबडीत किंवा पूर्ण काळजी न घेतल्यामुळे आधार आणि पॅन कार्डमध्ये वापरकर्त्याची वेगवेगळी नावे किंवा स्पेलिंग वेगळे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
या परिस्थितीत आधार कार्ड व पॅनकार्ड लिंक करताना नाव जुळत नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. तेव्हा वापरकर्त्याला पुढे काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही.
तेव्हा एक लक्षात घ्या कि, तुमच्या आधार आणि पॅनमध्ये नाव वेगळे असल्यास तुम्ही ते दुरुस्त करू शकता. त्यासाठी काही माहिती द्यावी लागते त्यानंतर तुमचे नाव दुरुस्त केले जाऊ शकते.
तुम्ही जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन हे करू शकता. येथे तुम्हाला आधार बदलाचा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये योग्य माहिती द्यावी लागेल.
यासोबतच या फॉर्ममध्ये सहाय्यक कागदपत्रेही जोडावी लागतील. तपशील अपडेट करण्यासाठी केवळ 25 ते 30 रुपये मोजावे लागतील. तथापि, ही रक्कम केंद्र आणि स्थानानुसार बदलू शकते. यानंतर तुमचे नाव दुरुस्त केले जाईल.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड पोर्टलवर, तुम्ही पॅन कार्डवरील तुमचे नाव सुधारू शकता. वेबसाइटच्या होमपेजवर, ऍप्लिकेशन टाईपमध्ये करेक्शन इन एक्सिस्टिंग पॅनचा पर्याय निवडावा लागेल.
यानंतर, पुन्हा आपल्याला श्रेणी प्रकार निवडावा लागेल आणि नाव दुरुस्त करण्यासाठी आधार दस्तऐवज संलग्न करावा लागेल. जसे जन्म तारीख बरोबर असलेला शाळा सोडल्याचा दाखला तत्सम अधिकृत कागदपत्र द्यावे लागेल.
यानंतर, तुम्हाला ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करावे लागेल. या कामासाठी काही शुल्कही आकारण्यात येणार आहे. अद्ययावत पॅन कार्ड अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांच्या आत अर्जदाराला पाठवले जाते.