नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार हा महिना खूप व्यस्त असेल. चार कंपन्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) पुढील आठवड्यात येत आहेत.
यात मेदांता ब्रँड ग्लोबल हेल्थ लिमिटेड आणि मायक्रो फायनान्स लोन प्रोव्हायडर फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेड यासह एकूण चार कंपन्यांचा समावेश आहे.
इतर दोन कंपन्यांमध्ये केबल आणि वायरलेस हार्नेस असेंब्ली बनवणारी DCX Systems आणि BKJ Foods International यांचा समावेश आहे.
मर्चंट बँकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार कंपन्या आयपीओद्वारे एकत्रितपणे 4,500 कोटी रुपये उभारतील. युनिपोर्ट्स इंडिया आणि फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा आयपीओ नोव्हेंबर महिन्यात बाजारात येण्याची दाट शक्यता आहे.
याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. DCX चा IPO 31 ऑक्टोबरला उघडेल आणि 2 नोव्हेंबरला बंद होईल.
फ्यूजन मायक्रो फायनान्सचा IPO 2 नोव्हेंबरला उघडेल आणि 4 नोव्हेंबरला बंद होईल. ग्लोबल हेल्थ आणि BKJ फूड्सचे IPO 3 नोव्हेंबरला उघडतील आणि 7 नोव्हेंबरला बंद होतील.
या वर्षी, 2022 मध्ये आतापर्यंत एकूण 22 कंपन्यांनी त्यांचे IPO आणले आहेत. या कंपन्यांनी शेअर बाजारातील विक्रीतून आतापर्यंत 44,000 कोटी रुपये उभे केले आहेत.
गेल्या वर्षी 2021 मध्ये एकूण 63 कंपन्यांचे IPO बाजारात आले होते. त्यातून 1.19 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
आता तुम्ही म्हणाल IPO बाजारात येत आहेत. पण मार्केट खरोखर कसे चालले आहे? याचे उत्तर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी दिले आहे. त्यांनी बाजाराच्या स्थितीची माहिती दिली.
नायर यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी बाजारात खूप चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आयपीओ बाजारासाठी हे वर्ष कमजोर राहिले.
परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षक किमतीत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे, असा दावा त्यांनी केला.