धर्म बदलण्यासाठी दबाव, भाऊ आणि वडिलांचा शिरच्छेद करण्याची धमकी, पीडितेची पोलिसांकडे धाव

Cime News

फिरोजाबाद : यूपीच्या फिरोजाबादमध्ये पोलिस कॉन्स्टेबलच्या मुलीला फेसबुकवर तरुणाशी मैत्री करणे महागात पडले. मैत्रीनंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर बोलण्याचा सिलसिला सुरूच झाला. त्यानंतर दोघे भेटले.

त्यानंतर तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. मुलीने नकार दिल्याने भाऊ आणि वडिलांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

त्यासोबतच धर्म बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. तरुणाचा त्रास जास्त होऊ लागल्यावर तरुणीने आता पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण फिरोजाबादच्या शिकोहाबाद पोलीस ठाण्याचे आहे. येथे राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीची अमरोहा येथे राहणाऱ्या शाहरुख खानसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती.

यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरूच राहिली. मग एके दिवशी दोघांनी भेटण्याचा बेत आखला. 24 सप्टेंबरला शाहरुख अमरोहाहून शिकोहाबादला आला होता.

येथे येऊन तो तरुणीला भेटला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व आपल्या गोड बोलण्याने तिला आपल्यासोबत अमरोहा येथे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला.

सोबतच मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. यादरम्यान त्याने मुलीचे काही अश्लील फोटोही क्लिक केले होते, त्याच्या जोरावर तिला त्रास देणे सुरु केले.

तरुणीच्या नावाने बनावट एफबी आयडी बनवला

dd

या घटनेनंतर तरुणीने शाहरुखशी बोलणे बंद केले. तेव्हा तिचा प्रतिशोध घेण्यासाठी शारुखने वेगवेगळ्या फेसबुक आयडीवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला.

त्याच्यासोबत मुलीचे फोटोही होते. याचा फायदा घेत शाहरुखने फेसबुक अकाउंट बनवून मुलीचे अनेक फोटो अपलोड केले आणि लग्न करण्यासाठी धमकी द्यायला सुरुवात केली.

वडिलांचा शिरच्छेद करण्याची धमकी

शाहरुकच्या वागण्याने व्यथित झालेल्या मुलीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तिच्याशी वारंवार धर्म परिवर्तन करून तिच्याशी लग्न करण्याविषयी दबाव आणत होता.

मुलीने नकार दिल्यानंतर त्याने पिडीतेला तिच्या भावाचा आणि वडिलांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तिच्या बहिणीला मारण्याची धमकी देऊ लागला.

त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार 

शाहरुखच्या धमक्यांना कंटाळून पीडित तरुणीने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. यासोबतच चॅटिंग आणि फोन कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागली आहे.

पोलीस म्हणाले

शिकोहाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी रणविजय सिंह यांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.