मुंबई : देशात सध्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी विरोधक मोर्चेबांधणी करत आहेत. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
त्यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत विरोधी पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आणि राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यास मला आनंद होईल,” असे छगन भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले भुजबळ?
“शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत विरोधी पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आणि राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यास मला आनंद होईल,” असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
21 जुलैपर्यंत नवीन राष्ट्रपतीची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शरद पवारांनी यावेळी राष्ट्रपती व्हावे यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचा आग्रह आहे; असे ट्विट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केले आहे.
महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल.#Maharashtra pic.twitter.com/IlLgZMliIe
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 12, 2022
महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती देशाची राष्ट्रपती झाली तर मला त्याचा आनंद होईल. शरद पवार यांना राष्ट्रपतीपद मिळाले तर काँग्रेसचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.या ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रपती आणि शरद पवार
शरद पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला 50 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. पवारांची राजकीय गुगली भल्याभल्या राजकीय तज्ञांना सुटत नाही.
मात्र पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदानी पवारांना कायमचं हुलकावणी दिली आहे. देशातील घटनात्मक सर्वोच्च पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदासाठी नेहमीच त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे, पण त्या खुर्चीत बसण्याचा मान त्यांना मिळाला नाही.