बीड : मी एक संघर्षमय जीवन जगलेल्या पित्याची मुलगी आहे, मला संघर्षाचा वारसा आहे, मी संघर्ष करणार आहे. जोडे उचलणाऱ्या लोकांची इतिहासात कधीच नोंद घेतली जात नाही.
त्यामुळे प्रत्येकाला संघर्ष आहे. संघर्ष मला नवा नाही, मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. त्यामुळे संघर्ष माझ्यासाठी नवीन असल्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नये.
मी संघर्ष करणार, नाकारणार नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात संघर्षाचा उल्लेख केला पण तो रोख कुणावर? आणि कोणाकडे होता, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मी आमदार नाही, मंत्री नाही, साधी ग्राम पंचायत सदस्य नाही. मी कोणावर नाराज होऊ? तुम्ही आला नाहीत, तर मात्र नाराज आहे.
मला गर्व नाही, मी स्वाभिमानी आहे, गोपीनाथ मुंडे यांच्यावर व तुमच्यावर विश्वास आहे. मी त्याग केला आहे, तुम्हाला मी फक्त स्वाभिमान देऊ शकते.
माना की औरो के मुकाबले कुछ ज्यादा पाया नहीं मैंने,
पर खुश हूँ की खुद को गिरा के कुछ उठाया नहीं मैंने…!
या शब्दात आपल्या भूमिका आणि रोखठोक विचार मांडले, 2024 ची तयारी करू. एकदा आपण समर्पण करून टाकू, कामासाठी झोकून देऊ, चर्चेला विराम द्यायचा आहे.
मला पदर पसरून कोणाकडे जायचे नाही, मला तुमच्याकडे यायचं आहे, तुमचा आशीर्वाद असेल तर कोणत्याही लढाईत तुमच्यासमोर आहे. तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी आहे.
दसऱ्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे बीड येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यात बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्यानंतर गोपीनाथगड ते भगवान भक्ती रॅलीला सुरुवात झाली.