Hyderabad Liberation Day : आज हैदराबाद मुक्ती संग्राम (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन) दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यातील लोकांनी 13 महिने स्वातंत्र्यासाठी लढा दिला.
दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी उपस्थित राहून ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात रक्त सांडणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना मी विनम्र अभिवादन करतो. हा लढा सोपा नव्हता, परंतु रझाकाराच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी आणि स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी केलेल्या बलिदानाबद्दल या वीरांना राज्यातील जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानले.
स्वच्छ भारतासाठी केंद्र सरकारकडून १२ हजार कोटी मिळाले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळ कमी व्हावा, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवावे, आम्ही वॉर रूममधून विकासकामांचा आढावा घेत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जो काही अनुशेष आहे तो भरून काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करेल. वॉटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी मराठवाड्यात प्रयत्न केले जातील. ते म्हणाले की, प्रत्येक समाजातील घटकांचे सरकार असते.
अंबादास दानवे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, एमआयडीसीसाठी दिलेल्या भूखंडाला कोणतीही स्थगिती देण्यात आली नाही. केवळ त्याबाबत माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवीन उद्योगांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात काय झाले यावर मी बोलणार नाही. मात्र यापुढील उद्योगांना पूर्ण सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले.
शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने
औरंगाबादमध्ये दरवर्षी हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून आणि ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. मात्र यंदा मराठवाडा मुक्ती दिनावर औरंगाबादमध्ये राजकारण होण्याची शक्यता आहे.
यावेळी शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने येणार आहेत. ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री तातडीने हैदराबादला रवाना होतील.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत हैदराबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी शिंदे जाणार आहेत. मात्र शिंदे यांच्या छोटेखानी भेटीवर शिवसेनेने आक्षेप घेत टीका केली आहे. मराठवाडा मुक्तीदिनी शिवसेनाही ध्वजारोहण करणार आहे.
मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा
- औरंगाबादच्या वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी
- लातूरमध्ये कृषी महाविद्यालयाची तरतूद
- मराठवाडा वॉटर ग्रीडमधून लातूरला मंजुरी
- पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहे
- जायकवाडी कालव्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे
- मराठवाड्यातील पाणी वळवण्याचा प्रकल्प
- जालन्याच्या पाणीपुरवठ्याचे नूतनीकरण
- नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार आहे