तुमच्या नावावर किती सिम आहेत? अवघ्या 3 क्लिकमध्ये जाणून घ्या, फक्त तीन स्टेप वापरा

How many SIMs do you have in your name?

How many SIMs do you have in your name? | स्कॅमर (Scammers) सिमकार्डच्या मदतीने अनेक प्रकारची फसवणूक करतात. घोटाळेबाज दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने जारी केलेले सिम मिळवतात. ही सिम बनावट पद्धतीने काढली जाणे उघड आहे.

त्यामुळे त्यांच्या नावाने जारी केलेल्या सिमचा नंबर शोधता येईल का, असा प्रश्नही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो. तेव्हा याचे उत्तर हो असे आहे. तुमच्या सिमचे डिटेल शोधले जाऊ शकतात. यासाठी एक अतिशय सोपा मार्ग आहे.

तुम्ही सरकारी वेबसाइटच्या मदतीने हे करू शकता. तुमच्या आधार कार्डवर किती सिम जारी केले आहेत हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, येथे संपूर्ण पद्धत सांगितली जात आहे.

या वेबसाइटची मदत घ्या

या कामासाठी, तुम्हाला दूरसंचार विभागाच्या (DoT) वेबसाइटची मदत घ्यावी लागेल. सर्वप्रथम, तुम्हाला टेलिकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर (Telecom Analytics for Fraud Management and Consumer or TAFCOP) किंवा TAFCOP या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

यासाठी तुम्ही तुमच्या फोन किंवा पीसीमध्ये https://tafcop.dgtelecom.gov.in/ वेबसाइट उघडू शकता.
त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.

मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. त्याची पडताळणी (Verification) करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरशी लिंक केलेल्या सर्व मोबाईल नंबरची माहिती येथे दिसेल.

जर तुम्हाला वाटत असेल की एखादा नंबर चुकीच्या पद्धतीने जारी केला गेला असेल तर तुम्ही तो येथे बंद करण्याची विनंती देखील दाखल करू शकता.

यासाठी तुम्हाला रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि अनधिकृत मोबाइल नंबरसमोर ब्लॉक करावे लागेल. वेबसाइटनुसार, ही सेवा सध्या फक्त निवडक राज्यांमध्ये उपलब्ध आहे.

परंतु यादीमध्ये सामील असलेल्या राज्यांव्यतिरिक्त, आम्ही इतर राज्यांसाठी देखील प्रयत्न केला. तेव्हा असे दिसून आले कि ही सेवा बहुतांश राज्यांमध्ये उपलब्ध झाली आहे.