Homemade Soyabean Seeds। लातूर : मराठवाड्यात खरीप हंगामातच नव्हे, तर उन्हाळी हंगामातही सोयाबीन हे प्रमुख पीक ठरत आहे. सोयाबीनचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. क्षेत्र वाढत असताना सोयाबीन बियाणांच्या तक्रारीही वाढत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांवर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तथापि, मात्र घरचे बियाणे वापरताना काय काळजी घ्यावी यासंदर्भात अनेकांना काही माहितीच नसते.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी असून पेरणीपूर्वी काळजी घेतल्यास नुकसान टळेल आणि अतिरिक्त खर्चही टाळता येईल. घरगुती बियाणे उत्पादनासाठी उपयुक्त आहेत परंतु त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
Homemade Soyabean Seeds। घरी बियाणे कसे तयार करायचे
सध्याच्या महागाईत बियाणांचा वाढता दर आणि अविश्वसनीय उत्पादन यामुळे शेतकऱ्यांसाठी केवळ घरगुती बियाणेच फायदेशीर ठरते. त्यासाठी उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बंद पोत्यातील मूठभर धान्य बाहेर काढून घ्यावे.
- त्यानंतर सर्व पोत्यांमधील काढलेले धान्य हे एकत्र करुन घ्यावे.
- त्यानंतर काढलेले सोयाबीन हे स्वच्छ धुऊन घ्यावे.
- गोणपाटाचा एक तुकडा हा जमिनीवर पसरून ठेवावा.
- पोत्यातून बाजूला काढलेल्या धान्यातून 100 दाणे मोजावे आणि दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर ओळीत ठेवावे.
- त्यानंतर गोणपटावर चांगले पाणी मारून त्याला ओले करावे.
- गोणपटावर पाणी शिंपडून ते ओले केल्यानंतर त्याला बाजूला ठेवावे.
- यानंतर बियाणांवर झाकण्यासाठी दुसऱ्या गोणपटाचा वापर करावा.
- गोणपटाच्या तुकड्याची बियाणासकट गुंडाळी करुन ते गोणपाट थंड हवेच्या ठिकाणी ठेवावे.
- सलग सात दिवसानंतर गोणपाटाची गुंडाळी काढून त्याच्यातील उगवण क्षमता पाहून पेरणी केली तर घरगुती बियाणे फायद्याचे ठरते.
Homemade Soyabean Seeds । बियाण्याची गुणवत्ता ओळखा
घरोघरी बियाणे बनवण्याची प्रक्रिया असली तरी हा प्रयोग यशस्वी होतो की नाही हेही पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे या बिया गोणपाटाच्या आधारे साठवल्या जातात.
गोणपाटात गुंडाळलेल्या 100 बियांपैकी 70 बिया उगवल्या तरी पेरणी योग्य मानली जाते. घरच्या बियाणांबाबत परिश्रम असले तरी उत्पादनात वाढ निश्चित मानले जाते.
Homemade Soyabean Seeds। बियाणे-खते संपर्कात समस्या
बियाणे व खतांच्या विक्रीत अनियमितता आढळून आल्यास कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर पथके नेमली आहेत. यामुळे अनियमिततेला आळा बसणार असून शेतकऱ्यांची लूट रोखण्यासाठी शासनाने काही क्रमांकही दिले आहेत.
शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास 8446117500 या क्रमांकावर संपर्क साधावा. 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.